२२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून, त्याची जय्यात तयारी सुरू झाली आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी आपण राम मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सध्या एक कंपनी खूप चर्चेत आहे, ती म्हणजे प्रवेग. प्रवेगच्या अयोध्या कनेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास या कंपनीचा ECO हा लक्झरी हॉस्पिटॅलिटी व्यवसाय आहे. कंपनी आलिशान तंबू बसविण्याचे काम करते. कंपनीने ६ शहरांमध्ये तंबूच्या माध्यमांतून ५४० हून अधिक खोल्या बांधल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्या ब्रह्मा कुंडात कंपनीकडून टेंट सिटीचे काम करण्यात आले आहे. दिवाळी २०२३ पासून यावर काम सुरू झाले. दिवाळी २०२३ पासून हा शेअर १४० टक्क्यांनी वाढला. या टेंट सिटीमध्ये खोलीचे सरासरी भाडे ७ ते ९ हजार रुपये आहे. सुरुवातीची व्याप्ती ४०-५० टक्के असणे अपेक्षित आहे. कंपनीचे अयोध्येत ३० तंबू आणि १ रेस्टॉरंट आहे.

हेही वाचाः “गुजराती असल्याचा अभिमान, ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी”; मुकेश अंबानींचे वक्तव्य, म्हणाले, “हरित ऊर्जेत…”

प्रवेगचे मूल्यांकन किती?

प्रवेगचे मूल्यांकन खूप महाग असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेअर १३० च्या पटीत ट्रेडिंग करीत आहे. व्हायब्रंट गुजरात मोहीम, “चलो लक्षद्वीप” आणि अयोध्येतील त्याच्या प्रकल्पाच्या आधारे प्रवेगने एका महिन्यात ७० टक्के वाढ पाहिली आहे. Praveg देशांतर्गत व्यवस्थापन अन् आदरातिथ्य सेवा प्रदान करते. “अयोध्येतील विद्यमान रिसॉर्ट्समध्ये राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जोरदार बुकिंग होत आहे,” असे गुंतवणुकीचे व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध गर्ग यांनी सांगितले. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज म्हणते की, नोव्हेंबर २०२३ पासून कार्यरत असलेल्या कंपनीच्या अयोध्या प्रकल्पातील सरासरी भाडे सुमारे ८ हजार रुपये आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रवेग अयोध्येत आणखी एक टेंट सिटी बनवू शकते.

हेही वाचाः ”मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? बोऱ्याबिस्तारा गुंडाळा अन् गुजरातला जा,” अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेकडून संताप व्यक्त

प्रवेगचे इतर प्रकल्प

प्रवेगच्या इतर प्रकल्पांबद्दल बोलायचे झाल्यास अयोध्या व्यतिरिक्त रण रिसॉर्ट, टेंट सिटी-नर्मदा, टेंट सिटी-वाराणसी, बीच रिसॉर्ट-दमण, जंपोर-दमण, चक्रतीर्थ-दीव आणि धोलाविरा-गुजरात हे त्याचे इतर प्रकल्प आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveg stock with its strong association with the shriram temple rose 140 per cent after diwali vrd