(बीएसई कोड ५४३६५७)
प्रवर्तक : केमिकास स्पेशलिटी केमिकल्स एलएलपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारभाव : रु. ६३४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : स्पेशालिटी मरीन केमिकल्स
भरणा झालेले भागभांडवल : रु. २४.६१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५३.६०

परदेशी गुंतवणूकदार ६.०३
बँकस्/ म्युचुअल फंडस्/ सरकार २९.८०
इतर/ जनता १०.५६
पुस्तकी मूल्य : रु. ८६.९

दर्शनी मूल्य : रु. २/-
लाभांश : — %

प्रति समभाग उत्पन्न : रु. २०.७
किंमत उत्पन्न गुणोत्तर : २३.८

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : २४.५
डेट इक्विटी गुणोत्तर : ३.४८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४.२९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ३८.७

बीटा : ०.८
बाजार भांडवल : रु. ७,८२० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : ७३२ / ४४०

आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी भारतातील अग्रगण्य स्पेशलिटी सागरी रासायनिक उत्पादक असून जगभरातील ग्राहकांना ब्रोमाइन, औद्योगिक मीठ आणि सल्फेट ऑफ पोटॅशचे उत्पादन पुरवते. कंपनी भारतातील ब्रोमाइन आणि औद्योगिक मिठाची सर्वात मोठी निर्यातदारदेखील आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या कच्छच्या रणमधील आपल्या समुद्राच्या साठ्यातून घटक मिळवून, गुजरातमधील हाजीपीरजवळील सुविधेमध्ये कंपनी ही उत्पादने तयार करते. कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरला असून गेल्या वर्षात आर्कियन केमिकल्सने १३ देशांमधील १८ जागतिक ग्राहकांना आणि २४ देशांतर्गत ग्राहकांना आपल्या उत्पादनांची विक्री केली.

कंपनीच्या सर्वच उत्पादनांना उत्तम मागणी असून प्रमुख उत्पादन ब्रोमाइन हे फार्मास्युटिकल्स, ॲग्रोकेमिकल्स, वॉटर ट्रीटमेंट, फ्लेम रिटार्डंट, ॲडिटीव्ह, तेल आणि वायू आणि ऊर्जा स्टोरेज बॅटरीजमध्ये मुख्य रॉ मटेरियल म्हणून वापरले जाते. तसेच औद्योगिक मीठ हा सोडियम कार्बोनेट (सोडा राख), कॉस्टिक सोडा, हायड्रोक्लोरिक ॲसिड, क्लोरीन, ब्लीचिंग पावडर, क्लोरेट्स, सोडियम सल्फेट (मिठाचा केक) आणि सोडियम धातूच्या उत्पादनासाठी रासायनिक उद्योगात वापरला जाणारा महत्त्वाचा कच्चा माल आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे खत म्हणून वापरले जाते आणि त्याचे वैद्यकीय उपयोगही आहेत.

आगामी काळात भारतातील सल्फेट ऑफ पोटॅशची प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्याचा सागरी रसायनांचा व्यवसाय प्रामुख्याने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बी२बी आधारावर चालविला जातो. चीन, जपान, दक्षिण कोरिया, कतार, बेल्जियम आणि नेदरलँड्स या प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये आर्कियन आपली उत्पादने निर्यात करते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये सोजित्झ कॉर्पोरेशन, जे कंपनीचे शेअरहोल्डरदेखील आहेत. शेडोंग तियानी केमिकल कॉर्पोरेशन, युनिब्रोम कॉर्पोरेशन, वानहाऊ केमिकल्स आणि कतार विनाइल कंपनी लिमिटेड यांचाही तिच्या ग्राहकांमध्ये समावेश आहे.

डिसेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत १९ टक्के वाढ साध्य करून ती ३६५ कोटींवर नेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल १०१ टक्के वाढ होऊन तो ९८.२८ कोटींवर गेला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने प्रत्येकी ४०७ रुपये दराने ‘आयपीओ’द्वारे बाजारात पदार्पण केले होते. ‘आयपीओ’ला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सध्या ६४० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर प्रत्येक मंदीत खरेदी करण्यासारखा आहे. हा शेअर दोन वर्षांत ३० टक्के परतावा देऊ शकेल.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Precious rubies archean chemical industries limited in the rann of kutch asj