PVR INOX Share Price: मेगा बजेट चित्रपट आदिपुरुष आज १६ जून रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. देशभरातील ४००० हून अधिक स्क्रीनवर तो प्रदर्शित झाला असून, बाहुबली स्टार प्रभास आणि क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुषसाठी प्रेक्षकांमध्येही प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. तसेच आगाऊ बुकिंगचा ट्रेंड जबरदस्त आहे. हे पाहता या चित्रपटामुळे मल्टिप्लेक्स स्टॉक पीव्हीआर आयनॉक्सला मोठी अपेक्षा आहे, असे ब्रोकरेज हाऊसेस म्हणणे आहे. बर्‍याच काळानंतर जानेवारीमध्ये रिलीज झालेल्या पठाणसारखेच कलेक्शन जर आदिपुरुषचेही झाले, तर PVR-Inox शेअर उच्चांकी पातळी गाठू शकतो आणि पुढील शेअर्सची किंमत १९०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित हा चित्रपट PVR Inox साठी गेमचेंजर ठरू शकतो.

प्रभुदास लिल्लाधर येथील संशोधन विश्लेषक जिनेश जोशी सांगतात की, आदिपुरुषच्या आगाऊ बुकिंगचा ट्रेंड आशादायक आहे. हा कल असाच सुरू राहिल्यास चित्रपटाच्या कमाईमुळे PVR-Inox ची कमाई 1QFY24E मध्ये मजबूत होईल. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत ४ चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. किसी का भाई किसी का जानने ११० कोटी, पीएस २चे कलेक्शन १८० कोटी, केरळ स्टोरीचे कलेक्शन २४० कोटी आणि फास्ट एक्सने १०० कोटी कमावले. तर भोला, जरा हटके जरा बचके, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी आणि विरुपाक्षनेही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जर आदिपुरुष निव्वळ ५०० कोटी कमावले तर पुढील काही तिमाहींमध्ये PVR-Inox चा शेअर्स चांगलाच वधारेल. आदिपुरुष देशभरात सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. प्रभुदास लिलाधर म्हणतात की, पीव्हीआर-आयनॉक्सला चित्रपटातून चांगला फायदा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत स्टॉकला BUY रेटिंग देताना १८७९ रुपयांचे टार्गेट दिले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सध्याची किंमत १५०० रुपये होती.

sensex news loksatta
‘सेन्सेक्स’ ८३ हजारांखाली, अखेरच्या तासातील नफावसुलीने माघार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mahada house prices increased instead of decreasing
म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
png jewellers ipo analysis
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त शेवटच्या दिवशी ५९.४१ पट भरणा
Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
Factory activity at three-month low Production PMI Index at 57.5 points in August
कारखानदारीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकाला, निर्मिती ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.५ गुणांवर
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Thane, woman molestation in thane, molestation, airline employee, Naupada police, Pachpakhadi, complaint, safety, womens safety, thane news
ठाण्यात विमान कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

ब्रोकरेज हाऊस नुवामाने PVR INOX वर BUY रेटिंगदेखील दिले आहे, ज्याचे लक्ष्य १९१० रुपये आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, जानेवारी २०२३ मध्ये ब्लॉकबस्टर (पठाण) नंतर बहुतेक बॉलीवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत निराश केले आहे. मुख्यतः सामग्रीच्या गुणवत्तेच्या अभावामुळे द केरळ स्टोरीचं कलेक्शन थोडं चांगलं झालं आहे आणि आता काही चर्चेत असलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या क्रमाने आज आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. PVR INOX ला या चित्रपटाच्या बुकिंगच्या ट्रेंडचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचाः ६३ हजार कोटी रुपये : सरकारी कंपन्या इतिहास घडवणार! तिजोरीत विक्रमी डिव्हिडंडची भर टाकणार

आदिपुरुष व्यतिरिक्त जूनमध्ये येणार्‍या इतर चित्रपटांमध्ये सत्यप्रेम की कथा (कार्तिक आर्यन स्टारर) आणि फ्लॅश एक्स यांसारखे चित्रपटही चांगला गल्ला जमवण्याची शक्यता आहे. जून तिमाहीची सुरुवात थोडीशी सुस्त झाली असली तरी आदिपुरुषामुळे त्यात चांगली सुधारणा होण्याची आशा आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, २०२२ च्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडला कंटेंट समस्येचा सामना करावा लागत आहे, निर्मात्यांनी त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की, दक्षिण भारतातही प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे, त्याप्रमाणेच हे ओटीटी आणि सिनेमा हे दोन्हीमध्ये चांगली कमाई करतील. PVR INOX यंदा नवीन स्क्रीन्सवर ७०० कोटी रुपये खर्च करीत आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १२०० कोटी F&B कमाईसह PVR INOX हा भारतातील आघाडीच्या QSR ब्रँडपैकी एक आहे आणि होम डिलिव्हरी, प्री-तिकिटिंग विक्री आणि मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न याद्वारे मेनू ऑफरिंगचा विस्तार करीत आहे. PVR INOX ने नफा, नवीन स्क्रीन देणे आणि चित्रपट पाहण्याचा अनोखा अनुभव आणि चित्रपटातील सर्वोत्तम सेगमेंट तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचाः ‘या’ तारखेपर्यंत स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार