आजकालच्या मुलांना वित्तीय क्षेत्र फारच आवडते. कारण त्यांच्या दृष्टीने पैशाच्या जवळ राहिले की ते कमावणे देखील सोपे वाटते. पण नैतिकतेला यात विसरून चालत नाही. नुकत्याच घडलेल्या बाजारातील चढ-उतारांमुळे याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल किंवा नाही ते माहीत नाही. मात्र ‘इनसाइडर ट्रेडिंग’ हा नैतिकतेचा एक भाग. पुढे घडणाऱ्या घटना जर आधीच माहीत असतील, तर त्यानुसार गुंतवणूक करून फायदा मिळवता येतो, यालाच ‘इनसाइडर ट्रेडिंग’ म्हणतात. अंदाज बांधणे आणि आधीच माहिती असणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही कदाचित एखाद्या गोष्टीचा अंदाज बांधाल पण ‘इनसाइडर ट्रेडिंग’मध्ये अंदाज नसून खरी माहिती मिळवली जाते. तीदेखील त्यातील थेट सहभाग असणाऱ्या लोकांकडूनच आणि त्यानुसार गुंतवणूक करून नफा मिळवला जातो. भारतीय कायदे सध्याच्या परिस्थितीनुसार तसे कडक आहेत. पण तरीही यामध्ये वर्ष २००९ मध्ये अमेरिकेत घडलेला एक घोटाळा सगळ्यांचे डोळे उघडून गेला.

श्रीलंकेतील शिलाई मशीन बनवणारी सिंगर कंपनी खूप जणांना आठवत असेल. कारण त्यांनी क्रिकेटच्या स्पर्धा प्रायोजित केलेल्या होत्या. या कंपनीचे मोठे अधिकारी जे.एम.राजरत्नम यांचे सुपुत्र म्हणजे राजाकुमारन राजरत्नम म्हणजेच राज राजरत्नम ज्यांनी हा घोटाळा केला. यात त्यांना काही भारतीय लोकांची देखील साथ मिळाली. मात्र आशियायी वाघांनी अमेरिकेच्या इतिहासात आपले नाव काळ्या अक्षरात कोरून ठेवले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
After the decline Nifty again touched all-time highs
ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

आणखी वाचा-बाजारातली माणसं: डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता- आशीषकुमार चौहान

आपले उच्च शिक्षण अमेरिकेत केल्यावर राजरत्नम यांनी काही नोकऱ्या करून गॅलिओन समूहाची स्थापना केली. ही कंपनी हेज फंड चालवत असे, म्हणजेच त्या माध्यमातून श्रीमंतांच्या पैशांची नियोजनबद्ध गुंतवणूक करण्याचे काम करीत असे. गुंतवणूक करणाऱ्यांची अपेक्षा मात्र जास्तीचीच होती आणि त्यावरच गॅलिओनचे उत्पन्न अवलंबून होते. वर्ष २००८ च्या आर्थिक अरिष्टात खूप लोक संकटात आले आणि गोल्डमन सॅक्स नावाची प्रसिद्ध बँक देखील त्या फेऱ्यात सापडली. त्यामुळे बँकेला आर्थिक मदतीची गरज होती आणि गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी ती देण्याचे ठरविले. त्यांनी सुमारे ५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची तयारी दाखवली होती. ज्या संचालक मंडळात यावर शिक्कामोर्तब झाले, त्यातील एक संचालक भारतीय असणाऱ्या रजत गुप्ता यांनी अवघ्या २३ सेकंदात राजरत्नमला फोन करून ही माहिती सांगितल्याचे सिद्ध झाले.

आणखी वाचा-अस्थिर बाजारात हायब्रिड, मल्टी ॲसेट श्रेणी सर्वोत्तम

चौकशीनंतर रजत गुप्ता आणि राजरत्नम यांचे इतरही काही व्यापारी संबंध असल्याचे सिद्ध झाले. अमेरिकी शोधकर्ते त्यांच्यावर सुमारे ६ महिने लक्ष ठेवून होते आणि त्यांनी ध्वनिमुद्रित केलेली कित्येक संभाषणे या खटल्यात सादर करण्यात आली. त्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनिल कुमार, रूमी खान, रॉबर्ट मोफ्फाट आणि राजीव गोयल या अधिकाऱ्यांनी सुद्धा राजरत्नमला वेळोवेळी आतील बातमी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला, जो पुढे जाऊन सिद्ध देखील झाला. या सगळ्यांना शिक्षा झाली आणि सध्या ते शिक्षा भोगून बाहेर आहेत. हा घोटाळा सुमारे ६ कोटी डॉलरचा असल्याचा अंदाज होता. राजरत्नमला अटक झाली तेव्हा फक्त अमेरिकेत नाही तर श्रीलंकेच्या बाजारात देखील त्याचे पडसाद उमटले आणि तो काही दिवस गडगडला. या सगळ्या आरोपींनी नेहमीच आपला सहभाग नसल्याचे सांगितले, त्यामुळे हा खटला शोधकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय अवघड होता. अनैतिकता हा वित्तीय क्षेत्राचा शाप आहे, याचे भान ठेवूनच इथे काम करावे लागते.