Sensex And Nifty Today : भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशीही घसरण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक उघडले. सकाळी १०:३० वाजेपर्यंत सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला होता, तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,००० अंकांच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स २,२९०.२१ अंकांनी किंवा २.९१ टक्क्यांनी, तर निफ्टी ६६७.४५ अंकांनी किंवा २.८१ टक्क्यांनी घसरला आहे.

रिलायन्सपासून झोमॅटोपर्यंत अनेक कंपन्यांना फटका

सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या ३० कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा, झोमॅटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, आयटीसी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे शेअर्स नफ्यात होते.

subhash zambad loksatta news
१०० कोटींचा अपहार करणारे सुभाष झांबड आहेत कोण ?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Payments of Rs 400 crores pending from contractor in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदार आर्थिक अडचणीत, ४०० कोटींची देयके प्रलंबित
Maharashtra to ‘disqualify’ women with four-wheelers from receiving benefits under flagship Ladki Bahin Yojana
अपात्र ‘लाडक्या बहिणीं’मुळे साडेचारशे कोटींचा फटका; निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख लाभार्थी बाद
state bank of india net profit of rs 16891 crore for 3q
देशातील सर्वात मोठ्या ‘या’ बँकेला १६,८९१ कोटींचा निव्वळ नफा; डिसेंबर तिमाहीत ८४ टक्क्यांची वाढ
stock market news in marathi
सेन्सेक्सची त्रिशतकी घसरण, निफ्टी २३,७०० खाली; शेअर बाजाराच्या आजच्या सावध विरामाची कारणे काय?
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने

डिसेंबर २०२४ च्या विक्रमी उच्चांकावरून स्मॉलकॅप निर्देशांक २०% ने घसरला असून, मिडकॅप निर्देशांक त्याच्या विक्रमी उच्चांकावरून १८% ने घसरला आहे. आज बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला.

रिलायन्सला २९,४०० कोटी रुपयांचा फटका

या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारावर सर्वाधिक दबाव आणला आहे. बुधवारच्या व्यवहारातच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात सुमारे २९,४०० कोटी रुपयांची घट झाली. या आठवड्यात आरआयएलचे बाजार भांडवल ५६,५०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याबाबत सीएनबीसी आवाजने वृत्त दिले आहे.

जागतिक बाजारांची काय परिस्थिती?

आज आशियाई बाजारात, चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात तर जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नफ्यात पाहायला मिळाले. मंगळवारी अमेरिकन बाजार सकारात्मक ट्रेंडसह बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३४ टक्क्यांनी घसरून ७६.७४ डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ४,४८६.४१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

मंगळवारी १००० अंकांनी घसरला होता सेन्सेक्स

दरम्यान काल मंगळवारी दिवसभर सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक नकारात्मक पाहायला मिळाले. दिवसाच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स १,०१८.२० अंकांनी म्हणजेच १.३२ टक्क्यांनी घसरून ७६,२९३.६० वर बंद झाला होता, तर एनएसई निफ्टी ३०९.८० अंकांनी म्हणजेच १.३२ टक्क्यांनी घसरून २३,०७१.८० वर बंद झाला होता.

Story img Loader