भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. यामुळे कंपनीच्या शेअरने २७५५ चा जुना उच्चांक मोडून १७५६ चा इंट्राडे उच्चांक गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने गाठलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्सचा शेअर का वाढला ?

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या विलगीकरणाची घोषणा आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीपासून वेगळे केले जाणार आहे आणि हे डिमर्जर १ जुलैपासून लागू होणार आहे, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. २० जुलैपासून त्याची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचाः अदाणी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीकडून सर्वोच्च न्यायालयात ४१ पानी प्रतिज्ञापत्र सादर, मंगळवारी होणार सुनावणी

तो सेन्सेक्सचा टॉप गेनर राहिला

बाजाराच्या सुरुवातीपासून रिलायन्सच्या समभागात तेजी दिसून आली आहे आणि तो सेन्सेक्सचा टॉप गेनर राहिला आहे. दुपारी १२.१५ पर्यंत ते १०८.९० रुपये म्हणजेच ४.१४ टक्क्यांनी वाढून १७४२.५० रुपये प्रति शेअरवर व्यवहार करीत होता. आज NSE वर स्टॉक २६७५ च्या किमतीवर उघडला, त्यानंतर शेअरने चार टक्क्यांची उसळी घेतली आणि शेअरची किंमत २७५६ रुपयांवर पोहोचली.

हेही वाचाः Money Mantra : दोन गृहकर्जांची चिंता आहे? अशा पद्धतीने एकात रूपांतर करता येणार, पैशांचीही बचत होणार

रिलायन्सचं बाजारमूल्य १८ लाख कोटींवर

शेअरच्या किमतीबरोबरच रिलायन्सच्या बाजारमूल्यातही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. त्याचे बाजारमूल्य १८ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचे बाजार भांडवल १२ वाजण्याच्या सुमारास १८.५० लाख कोटी रुपये होते. परंतु Jio Financial Services च्या शेअर्सची किंमत किती असेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, त्याच्या शेअरची किंमत १७९ रुपये प्रति शेअर ते १८९ रुपये प्रति शेअरदरम्यान असू शकते.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance shares rally after jio financial services spinoff announcement market cap crosses rs 18 lakh crore vrd
Show comments