पीटीआय, नवी दिल्ली
हिंदुस्थान झिंक लिमिटेडमधील सरकारी भागभांडवल विकण्याचा बहुप्रतिक्षित निर्णय अखेर केंद्राने मंगळवारी घेतला. कंपनीतील सरकारच्या आणखी २.५ टक्क्यांपर्यंत हिश्शाची प्रति समभाग ५०५ रुपये किमतीवर पुढील दोन दिवसांत भांडवली बाजारात विक्री केली जाणार आहे. या विक्रीतून सरकारी तिजोरीत ५,००० कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित आहे.
दोन दिवस सुरू राहणाऱ्या या ‘ऑफर फॉर सेल’ धाटणीच्या समभाग विक्रीत, बुधवारचा (६ नोव्हेंबर) दिवस संस्थात्मक बोलीदारांसाठी आणि गुरुवारचा दिवस हा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी असेल. केंद्र सरकार ५.२८ कोटीं पेक्षा जास्त समभाग किंवा १.२५ टक्के भागभांडवली हिस्सा विकत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद लाभल्यास अतिरिक्त १.२५ टक्के भागभांडवलाची विक्रीची सरकारला मुभा असेल, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात दीपमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>ॲक्मे सोलरची प्रत्येकी २७५ ते २८९ रुपयांना प्रारंभिक भागविक्री; निवा बुपा ‘आयपीओ’द्वारे २,२०० कोटी उभारणार!
विक्रीसाठी निर्धारीत प्रत्येकी ५०५ रुपयांची किंमत ही हिंदुस्थान झिंकच्या मंगळवारी बंद झालेल्या ५५९.७५ रुपये भावाच्या तुलनेत गुंतवणूकदारांना १० टक्के सूट प्रदान करणारी आहे. वैयक्तिक छोट्या गुंतवणूकदारांसाठी दहा टक्के समभाग राखीव आहेत, जे प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंतच्या समभागांसाठी बोली लावू शकतील.सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत, हिंदुस्थान झिंकमध्ये केंद्र सरकारची २९.५४ टक्के हिस्सेदारी आहे, तर वेदान्त समूहाकडे ६३.४२ टक्के हिस्सेदारी आहे.