stock market opening today : आज गुढीपाडव्याच्या दिवशी गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय शेअर बाजारात काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (८ एप्रिल) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्सने काल सर्वाधिक उच्चांक ७४,८६९ तर निफ्टीने २२,७९७ चा उच्चांक गाठला होता. त्यानंतर आज कालचा विक्रम मोडीत निघाला असून सेन्सेक्सकने ७५ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीही २२,७६२ च्या वर आहे. आज सकाळी बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये २५९ अकांची वाढ होऊन तो ७५,००१.७७ नव्या उंचावर पोहोचला. त्याच दरम्यान निफ्टीमध्येही ७३.२५ अंकाची वाढ झाली आणि निफ्टीने २२,७३९.५५ हा उच्चांक गाठला.

बीएसई सेन्सेक्स आज सकाळी ३८२ च्या अंकानी उसळी घेत ७५,१२४.२८ ने उघडला. मे २०१४ साली सेन्सेक्सने पहिल्यांदा २५ हजारांचा टप्पा गाठला होता. तर २१ जानेवारी २०२१ रोजी ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?

बीएसईचे बाजार भांडवलदेखील सोमवारी १.५५ लाख कोटींनी वाढून ४०० लाख कोटींच्या पुढे सरकरले होते. मंगळवारी सकाळी एकूण शेअरचे मूल्य ४०१.८२ लाख कोटींवर पोहोचले. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांना १०० लाख कोटींचे बाजार भांडवल जोडण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी लागला. जुलै २०२३ मध्ये बीएसई एम-कॅपने ३०० लाख कोटींचा टप्पा गाठला होता.

निफ्टीमध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक, अपोलो हॉस्पिटल्स, हिंदालको आणि एलटीआयएम या पाच कंपन्यांनी सर्वाधिक लाभ दिला. तर दुसरीकडे आयशर मोटर्स, बीपीसीएल, एल अँड टी, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि रिलायन्स या पाच शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.

सरत्या आर्थिक वर्षातही बाजारात तेजी नोंदविली गेली होती. रुपयाच्या घसरणीनेही बाजारातील खरेदीपूरक उत्साह वर्षअखेर ओसरू शकला नाही आणि ऊर्जा, वाहन आणि धातू क्षेत्रातील समभागांना जोरदार मागणी दिसून आली. परिणामी २५ मार्च रोजी सेन्सेक्स ६५५.०४ अंशांनी (०.९० टक्के) वाढून ७३,६५१.३५ वर स्थिरावला होता. शुक्रवारी (२६ मार्च) ‘गुड फ्रायडे’निमित्त सार्वजनिक सुटी असल्याने भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहिले. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात बाजारात सातत्याने तेजी दिसत आहे.

Story img Loader