मुंबई : भांडवली बाजारात गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीच्या दौडीला बुधवारी लगाम लागला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने बुधवारी सेन्सेक्समध्ये २०२ अंशांची घसरण झाली. कमकुवत जागतिक कल आणि देशांतर्गत आघाडीवर बँकिंग आणि धातू कंपन्यांच्या समभागातदेखील विक्रीचा मारा झाल्याने सेन्सेक्स घसरला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०२.८० अंशांनी घसरून ८२,३५२.६४ पातळीवर स्थिरावला. अमेरिकी आणि आशियाई बाजारातील पडझडीमुळे सेन्सेक्सने ७२१.५० अंशांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली आणि ८१,८३३.६९ या सत्रातील नीचांकी पातळी त्याने स्पर्श केला होता.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा >>> Gold Silver Price : ऐन सणासुदीत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा; पाहा मुंबई, पुण्यासह ‘या’ शहरांतील नवीन दर

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८१.१५ अंशांची घसरण होऊन, २५,१९८.७० पातळीवर बंद झाला. सलग १४ सत्र आगेकूच कायम राखणारी विक्रमी मालिका यातून खंडित झाली. मंगळवारपर्यंतच्या सलग १४ व्या व्यवहार झालेल्या दिवसांत निफ्टीने १,१४१ अंशांची कमाई केली आहे.

हेही वाचा >>> बचतच अर्थव्यवस्थेत कर्ज-वितरणाचा सर्वोच्च स्रोत राहील; रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नरांचा बचतदरात वाढीचा विश्वास

अमेरिकेतील उत्पादनाशी निगडित कमकुवत आकडेवारी आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीबद्दल चिंता वाढल्याने जगभरातील भांडवली बाजारावर त्याचे नकारात्मक पडसाद उमटले, ज्यामुळे देशांतर्गत निर्देशांकांची तेजीची दौड थांबली. देशांतर्गत घडामोडींच्या अभावामुळे, निर्देशांक जागतिक संकेतांवरून पुढील दिशा निर्धारित करतील, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, ॲक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स आणि अदानी पोर्ट्सच्या समभागात घसरण झाली. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीसह स्थिरावले.

सेन्सेक्स ८२,३५२.६४ २०२.८० +(-०.२५%)

निफ्टी २५,१९८.७० ८१.१५ (-०.३२%)

डॉलर ८४.०२ ४

तेल ७३.६५ -०.१४

Story img Loader