Share Market Today: भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे. त्यामुळे बाजारात आजही नकारात्मक परिस्थितीच पाहायला मिळत आहे. अशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर शुल्क धोरणाबद्दलच्या चिंता आणि परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. शुक्रवारी सकारात्म पातळीवर उघडलेले सेन्सेक्स आणि निफ्टी काही वेळातच घसरले आहेत. दुपारी दोन वाजे पर्यंत सेन्सेक्समध्ये सुमारे ६०० अंकांची तर निफ्टी ५० मध्ये सुमारे २५० अंकांची घसरण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स काही प्रमाणात सावरल्याचे पाहायाला मिळाले आणि सेन्सेक्स १९९ अंकाच्या घरसरणीसह ७५,९३९.२१ वर होता. तर निफ्टी ५० निर्देशांक १०२ अंकांच्या घसरणीसह २२,९२९.२५ वर बंद झाला.

ट्रम्प यांच्या घोषणेचा बाजारावर परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह सर्व देशांवर ‘परस्पर कर’ कर लादण्याच्या त्यांच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. त्यांच्या या भूमिकेने आज संपूर्ण जागतिक बाजारपेठेचे वातावरण बिघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प म्हणाले, “भारत आमच्या वस्तूंवर जो काही कर लावेल, तोच कर आम्ही त्यांच्यावर देखील लावू.”

दुसरीकडे, आज झालेल्या बैठकीत मोदी आणि ट्रम्प यांनी २०३० पर्यंत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे मान्य केले आहे. पण, या कराराशी संबंधित फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्री

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर सुरू ठेवला आहे. त्यांनी या महिन्यात आतापर्यंत सुमारे १९,०७७ कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारीच्या सुरुवातीलाही त्यांनी भारतीय बाजारातून ७८,०२७ कोटी रुपये काढून घेतले होते. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय चलनातील सततची कमजोरी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे परकीय चलन बाहेर पडण्यास चालना मिळाली आहे. गुरुवारीही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,७८९.९१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. याबाबत मनी कंट्रेलने वृत्त दिले आहे.

तिसऱ्या तिमाहीतील निकालांचा नकारात्मक परिणाम

अनेक प्रमुख कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कमकुवत निकालांमुळे शेअर बाजाराचे मनोबल आणखी खचले आहे. कमकुवत निकालांमुळे आज १४ फेब्रुवारी रोजी नॅटको फार्मा, सेन्को गोल्ड आणि दीपक नायट्राइट सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे.