मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने सावध पवित्रा घेत, पुढील वर्षी कमी दर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक भांडवली बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. याचेच प्रतिबिंब म्हणून गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीच्या रेट्याने ‘सेन्सेक्स’ गुरुवारी ९६५ अंशांनी कोसळला. ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतल्याने घसरण वाढत गेली.

सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या घसरणीमुळे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ८०,००० पातळीच्या खाली घरंगळला आहे. गुरुवारच्या सत्रात तो ९६४.१५ अंशांनी म्हणजेच १.२० टक्क्यांनी घसरून ७९,२१८.०५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, निर्देशांक १,१६२.१२ अंशांनी कोसळून ७९,०२०.०८ या सत्रातील नीचांकी पातळीपर्यंत पोहचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४७.१५ अंशांची (१.०२ टक्के) घसरण झाली आणि तो २४ हजारांखाली २३,९५१.७० पातळीवर बंद झाला. सरलेल्या चार सत्रात सेन्सेक्सने २,९१५.०७ म्हणजेच ३.५४ टक्क्यांनी गडगडला आहे, तर निफ्टी ८१६.६ म्हणजेच ३.२९ टक्क्यांनी माघारी फिरला आहे.

Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loksatta editorial on Ferry boat accident in Mumbai
अग्रलेख: ‘बुडती’ हे जन…
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ
man throws acid on his Son in Law in Kalyan
Kalyan Crime : हनीमूनला काश्मीरला जाणार होता जावई, भडकलेल्या सासऱ्याने केला अॅसिड हल्ला; कल्याणमधली घटना
Rupee continues to decline against US dollar
रुपयाची ८५ पार धूळदाण
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!

हेही वाचा >>>‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा

अमेरिकी फेडने २०२४ मधील अंतिम बैठकीत अपेक्षेप्रमाणे पाव टक्का कपात केली. मात्र पुढील वर्ष-दोन वर्षात चलनवाढीवर इच्छित पातळीपर्यंत नियंत्रण मिळविण्याबाबत अनिश्चितता सूचित केल्यामुळे जागतिक पातळीवर समभाग विक्री वाढली. त्यातून स्थानिक भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बँकिंग आणि गृहनिर्माण या सारख्या व्याजदर संवेदनशील असलेल्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला. मात्र व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याच्या बँक ऑफ जपानच्या निर्णयामुळे अर्थतज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे समभाग विक्रीचा दबाव कमी होण्यास मदत झाली. दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा कायम ठेवला. मात्र ते आता औषधनिर्माणा या सारख्या बचावात्मक क्षेत्राकडे खरेदीसाठी वळले आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि महिंद्र अँड महिंद्र यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली, दुसरीकडे सन फार्मा, पॉवर ग्रिड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या समभागांची मात्र बाजार पडझडीत देखील कामगिरी चांगली राहिली.

हेही वाचा >>>‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर

गुंतवणूकदार ९.६५ लाख कोटींनी गरीब

बाजारातील सलग विक्रीच्या चार सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.६५ लाख कोटी रुपयांची घट झाली. सेन्सेक्सने चार सत्रात एकूण २,९१५ अंश गमावल्याने गुंतवणूकदारांना याची मोठी झळ बसली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९.६५ लाख कोटींनी घसरून ४४९.७६ लाख कोटी (५.२९ ट्रिलियन डॉलर) रुपयांपर्यंत खाली आले आहे.

सेन्सेक्स ७९,२१८.०५ -९६४.१५ -१.२० टक्के

निफ्टी २३,९५१.७० -२४७.१५ -१.०२ टक्के

डॉलर ८५.०५ १४ पैसे

तेल ७३.३३ -०.०८ टक्के

Story img Loader