Share Market Update Today : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात उत्साह दिसतोय. सेन्सेक्स १४०० हून अधिक अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने २२१२५ चा टप्पा ओलांडला आहे. सध्या सेन्सेक्स १४४४ अंकांनी वर असून, तो ७३०८९ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. तर निफ्टी ४२९ अंकांनी वाढून २२,१२६.८० च्या पातळीवर पोहोचला आहे. बँक, फायनान्शिअल, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांकही मजबूत झाले आहेत.

हेही वाचाः Meta Dividend : फेसबुक पहिल्यांदाच देणार लाभांश, मार्क झुकरबर्गला मिळणार ७०० मिलियन डॉलर्स

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

सध्या सेन्सेक्स ८३८ अंकांनी वर असून, तो ७२,४८३ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. तर निफ्टी २५२ अंकांनी वाढून २१,९५० च्या पातळीवर पोहोचला आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. आजच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या शेअर्समध्ये ICICI BANK, TECHM, HCLTECH, WIPRO, TITAN, TCS, RELIANCE यांचा समावेश आहे.

जागतिक संकेतही मजबूत

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी गुरुवारी अमेरिकन बाजारही वाढीने बंद झाले होते. गुरुवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ३७० अंकांनी वाढून ३८,५१९.८४ च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite १९८ अंकांनी वाढून १५,३६१.६४ च्या पातळीवर बंद झाला. तर S&P ५०० निर्देशांक ६१ अंकांनी वाढून ४,९०६.१९ च्या पातळीवर बंद झाला. NSE ने इंडिया सिमेंट्स आणि इंडस टॉवर्सला २ फेब्रुवारीच्या F&O बंदी यादीत समाविष्ट केले आहे, तर SAIL आणि Zee Entertainment Enterprises यांना यादीत कायम ठेवण्यात आले आहे.

Story img Loader