फायदा आणि किफायत पाहणे हाच खरे तर व्यवहारधर्म. पण शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी या बरोबरीने धीर, संयम राखण्यासह, अतिलोभ टाळलेलाच बरा. त्याचीच सध्या वानवा असल्याचे मुंबई शेअर बाजाराची ताजी स्थिती दर्शविते. मंगळवारप्रमाणेच बुधवारी सेन्सेक्सने सत्राच्या सुरुवातील सुमारे ५०० अंशांची भरारी घेतली, मात्र दिवसअखेर त्याची झेप खुंटून निम्म्यावर म्हणजे केवळ २२५ अंशांवर येऊन स्थिरावली.

शेअर बाजारात मोठ्या पडझडीच्या दिवसांनंतर, अनेक शेअर्सचे भाव आता डोके वर काढताना दिसत आहेत. पण तितक्यावरच समाधान मानून मिळेल तो नफा पदरी बांधून मोकळे होण्याची उतावीळ प्रवृत्तीही बळावली आहे. दिवसाअंती बाजारातील सुरुवातीची तेजी फसफसून विरून गेल्याचे दिसून येते त्यामागे हे कारण आहे.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News : वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी
raj thackeray on amit thackeray (1)
अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!
raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…
Armenia has emerged as India's leading defence export destination
भारताचा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आर्मेनिया; भारताला याचा किती फायदा?
Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान

हेही वाचा – जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए

बुधवारच्या अशाच नफावसुलीने घायाळ सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२४.४५ अंशांच्या वाढीसह अंशावर दिवसअखेर ७६,७२४.०८ स्थिरावला. सकाळच्या सत्रात सुमारे ४८० अंशांनी झेपावला, मात्र ७७ हजारांच्या पातळीपुढे मजल मारू शकला नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील, २३,३०० च्या महत्त्वपूर्ण पातळीला भेदण्यात अपयशी ठरला. २३,२९३.६५ या उच्चांकाला गवसणी घातल्यानंतर दिवसअखेर तो ३७.१५ अंशांच्या (०.१६ टक्के) कमाईसह, २३,२१३.२० या पातळीवर बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?

बुधवारच्या सत्रात ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स खरेदीमुळे चांगलेच वधारले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एनटीपीसी, कोल इंडिया यांत जवळपास ४ टक्क्यांची तेजी दिसून आली. बरोबरीने अदानी ग्रीन एनर्जी, एनएचपीसी, टाटा पॉवर, अदानी पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, टोरेंट पॉवर, एसजीव्हीएन आणि सीईएससी या शेअर्सच्या भावात १ ते ३ टक्क्यांची वाढ दिसली. इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारपेठेत अव्वल स्थान कमावलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीचा शेअर ०.८० टक्के वाढीसह २,२५२.६५ रुपयांपर्यंत वधारला.

तिमाही निकालांच्या परिणामी अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक अडीच टक्क्यांनी गडगडला. तिमाही निव्वळ नफ्यात ३६ टक्क्यांची वाढ नोंदवूनही बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर्स १ टक्का घसरणीसह ५२.२४ वर स्थिरावला. कल्याण ज्वेलर्सचा शेअर तब्बल ७.८१ टक्के आपटला. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स हे अन्य नुकसानीतील शेअर्स राहिले.

पुढची चाल काय?

निफ्टी जोवर २३,१३५ च्या वर टिकून आहे, तोवर त्याने २३,४०० पर्यंत झेप घेण्याची शक्यता दिसून येते, हे मंगळवारीही सूचित केले होते. या पातळीवरून त्याला मुख्य अडसर हा २३,३०० चा राहील, ज्याला त्याने बुधवार सत्रात धडका देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी सायंकाळी उशिराने जाहीर केली जाईल. तेथील व्याजदर कपातीचे आगामी भवितव्य काय आणि पर्यायाने भारतासह, उभरत्या अर्थव्यवस्थांचा बाजाराचा पुढील कलही तेथील महागाईचा पारा चढला की उतरला यावरून ठरेल. जिओजित फायन्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी याकडेच निर्देश करताना सूचित केले की, अमेरिकेतील महागाई किंचित वाढण्याची शक्यता आहे. यातून अमेरिकी मध्यवर्ती बँकेची म्हणजेच फेडच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेवर मर्यादा येतील. बरोबरीने खनिज तेलाच्या भडकत्या जागतिक किमती आणि डॉलरची सशक्तता देशांतर्गत महागाईला ऊत देणारी ठरेल.

हेही वाचा – ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?

जाता जाता…

शेअर बाजारातील अतिश्रीमंत गुंतवणूकदारांमध्ये काही मोजकीच नावे पुढे येतात. कचोलिया, भन्साली, कोठारी, भंडारी, दमानिया, शेठ आणि अर्थातच झुनझुनवाला वगैरे. या सर्वांच्या गुंतवणुका अफाट आणि या बड्या १५ गुंतवणूकदार अतिरथींनी सरलेल्या २०२४ मध्ये सरासरी २५ टक्के रिटर्न मिळविल्याचा ‘primeinfobase’चा एक अहवाल बुधवारी वाचनात आला. आपल्यापैकी किती जणांनी वर्षभरात हे इतके रिटर्न पाहिले असतील? आपल्यात आणि त्यांच्यातील या फरकाचे कारण काय? त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक तसेच ज्ञान व संशोधन संसाधने आणि माहिती स्रोत आहेत, हे मान्य. तरी त्यांचे सर्वात मोठे उजवेपण म्हणजे, त्यांची गुंतवणूक ही दीर्घावधीची आणि रिस्क घेण्याची त्यांची क्षमता मोठी असली तरी न डगमगता धीराने त्यांची गुंतवणूक सुरू राहिली. त्यांचे व्यवहारोपयोगी चातुर्य काही असेल तर ते नेमके हेच. आपणही आपापल्या क्षमतेत काहीशी रिस्क घेऊन, काहीशी कळ सोसून, गुंतवणुकीला पुरेसा वेळ देणे आणि संयम बाळगणे आपल्यालाही नक्कीच शिकता येईल!!

Story img Loader