देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांची घोडदौड कायम असून, सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक शुक्रवारी नव्या विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले. परदेशी गुंतवणूकदारांकडून अविरत सुरू असलेला निधी प्रवाह आणि जागतिक बाजारातील मजबूत कल यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार समभाग खरेदी केली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने त्यांनी निर्देशांकांना नव्या उंचीवर पोहोचवले.
भांडवली बाजारात तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २९५.७२ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०३.१४ अंशांनी वधारून ६४,७१८.५६ पातळीपर्यंत झेपावला. दिवसभरात त्याने ६४,७६८.५८ अंशांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी २१६.९५ अंशवाढीने १९,१८९.०५ वर स्थिरावला. निफ्टीने दिवसभरातील सत्रात १९,२०१.७० अंशांची सर्वोच्च पातळीला स्पर्श केला.
हेही वाचाः Money Mantra : LIC कडून धन वृद्धी योजना लाँच, ‘या’ तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी
देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणाऱ्या सकारात्मक आकडेवारीकडे दुर्लक्ष करत जागतिक पातळीवरील प्रतिकूल घडामोडींमुळे निर्देशांकांना विक्रमी उच्चांकी पातळीवर जाण्यापासून रोखले होते. मात्र आता जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि नैर्ऋत्य मान्सूनच्या समाधानकारक प्रगतीमुळे देशांतर्गत बाजार नवीन उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला. अमेरिकेत बेरोजगार दाव्यांमध्ये झालेली घसरण आणि पहिल्या तिमाहीतील विकासदरातील अनुकूल सुधारणा यामुळे जागतिक गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. तो ४ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मारुती, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, विप्रो, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीच्या समभागात मात्र घसरण झाली.
हेही वाचाः विश्लेषण : आजच पॅन अन् आधार लिंक करा अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागणार?
परदेशी गुंतवणूकदार सक्रिय
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या एका सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात १२,३५० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीचा वेग कमी होण्याच्या आशेने परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे मोर्चा वळविला आहे.
सेन्सेक्स ६४,७१८.५६ ८०३.१४ (१.२६ टक्के)
निफ्टी १९,१८९.०५ २१६.९५ (१.१४ टक्के)
डॉलर ८२.०३ ००
तेल ७४.७९ ०.६१