Market Record High: सेन्सेक्सने प्रथमच ७० हजारांची पातळी ओलांडली असून, बाजाराला नव्या शिखरावर नेले आहे. बाजाराने विक्रमी उच्चांक गाठून ऐतिहासिक वाढ दर्शवली आहे. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने ९.५५ मिनिटांनी ७०,०४८.९० ही पातळी गाठली होती. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये ७० हजारांच्याही वरची पातळी दिसण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली, पण निफ्टी सुरुवातीला लाल चिन्हात दिसत होता. त्यानंतर त्याच्यातही वाढ दिसून आली. बँक निफ्टीने जवळपास ३०० अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आहे. जागतिक बाजारांवर नजर टाकल्यास अमेरिकन बाजारातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात डाऊ जोन्स आणि S&P ५०० निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठली होती. आज क्रूडच्या किमती पुन्हा स्थिर झाल्या आहेत आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ७६ डॉलरच्या वर आहेत.
हेही वाचाः Zerodha चे संस्थापक नितीन अन् निखिल कामत यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ‘एवढं’ मानधन मिळालं
बाजार ओपनिंग कसे होते?
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात करताना बीएसई सेन्सेक्स १०० अंकांच्या म्हणजेच ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह ६९,९२५ वर उघडला. NSE चा निफ्टी ४.१० अंकांच्या नाममात्र घसरणीसह २०,९६५ वर उघडला.
प्री ओपनमध्ये बाजाराचे असे चित्र होते
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात बीएसई सेन्सेक्स १११ अंकांच्या म्हणजेच ०.१६ टक्क्यांच्या वाढीसह ६९९३६ च्या पातळीवर दिसून आला. याशिवाय NSE चा निफ्टी २.४० अंकांच्या किंचित वाढीसह २०९७१ च्या पातळीवर राहिला.
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
उघडण्याच्या वेळी सेन्सेक्समधील ३० पैकी १४ समभागांमध्ये वाढ होत आहे आणि १६ समभाग घसरणीसह व्यवहार करीत आहेत. सेन्सेक्स वाढवणाऱ्यांपैकी इंडसइंड बँक १.४७ टक्क्यांनी व एचसीएल टेक १.१९ टक्क्यांनी वधारत आहे. अल्ट्राटेक सिमेंट ०.८१ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक ०.६७ टक्क्यांनी वधारले.
सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीमध्ये कमजोरी
व्यवहाराच्या सुरुवातीला निफ्टी नाममात्र घसरणीसह लाल रंगात उघडला. मात्र, बाजार उघडताच तो ८ अंकांच्या किंचित वाढीसह ग्रीन झोनमध्ये आला. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऑटो, फार्मा, वित्तीय सेवा आणि आरोग्य सेवा निर्देशांकांमध्ये घसरण दिसून येत आहे आणि इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढत आहेत.
बँक निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली आहे
बँक निफ्टीने सुमारे ३०० अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आणि ४७,४८७.६० पर्यंत उच्चांक गाठला. आज बाजाराला बँक निफ्टीकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे कारण त्याचे सर्व १२ शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.