Market Record High: सेन्सेक्सने प्रथमच ७० हजारांची पातळी ओलांडली असून, बाजाराला नव्या शिखरावर नेले आहे. बाजाराने विक्रमी उच्चांक गाठून ऐतिहासिक वाढ दर्शवली आहे. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने ९.५५ मिनिटांनी ७०,०४८.९० ही पातळी गाठली होती. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये ७० हजारांच्याही वरची पातळी दिसण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली, पण निफ्टी सुरुवातीला लाल चिन्हात दिसत होता. त्यानंतर त्याच्यातही वाढ दिसून आली. बँक निफ्टीने जवळपास ३०० अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आहे. जागतिक बाजारांवर नजर टाकल्यास अमेरिकन बाजारातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात डाऊ जोन्स आणि S&P ५०० निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठली होती. आज क्रूडच्या किमती पुन्हा स्थिर झाल्या आहेत आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ७६ डॉलरच्या वर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा