युरोपीय बाजारातील सकारात्मक कल आणि देशांतर्गत आघाडीच्या समभागांमध्ये झालेल्या दमदार खरेदीच्या जोरावर सलग दुसऱ्या सत्रात उसळलेल्या सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी नवीन सार्वकालिक उच्चांकी शिखर पातळीला सर केले. प्रामुख्याने एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड जोडगोळी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या वजनदार समभागांतील तेजीने प्रमुख निर्देशांकांना मुसंडीचे बळ दिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स परिणामी १९५.४५ अंशांनी (०.३१ टक्के) वाढून ६३,५२३.१५ या विक्रमी पातळीवर स्थिरावला. चार सत्रांपूर्वी म्हणजे मागील शुक्रवारी नोंदवलेल्या ६३,३८४.५८ या सार्वकालिक उच्चांकी बंद स्तराला त्याने यातून मागे टाकले. बुधवारी दिवसभरात सेन्सेक्सने, २६०.६१ अंशांनी उसळून ६३,५८८.३१ या दिवसांतर्गंत ऐेतिहासिक शिखर पातळीला सर केले. यापूर्वी गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी सेन्सेक्सने नोंदविलेला ६३,५८३.०७ हा दिवसांतर्गंत विक्रमी उच्चांक यातून मोडला आहे. युनायटेड स्टेट्स, युरोझोन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील बहुतेक बाजारपेठांसह भारतीय शेअर बाजारही जागतिक यादीत सामील झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ४०.१५ अंशांच्या (०.२१ टक्के) कमाईसह १८,८५६.८५ हे नवीन उच्चांकी शिखर गाठले. वित्तीय, माहिती-तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये मूल्यवृद्धीमुळे निफ्टीने १८,८७५.९० अशी नवीन दिवसांतर्गत ऐतिहासिक उच्चांकी पातळीही बुधवारच्या व्यवहारात नोंदवली. तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्स ५२ आठवड्यांच्या नीचांकावरून थेट २२.८५ टक्क्यांनी वाढला आहे. २३ जून २०२२ रोजी ५१,६३२.८५ ची नोंद झाली. विशेष बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांत सेन्सेक्सच्या मुसंडीत मोठे योगदान राहणाऱ्या आयटीसी, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स तसेच महिंद्र अँड महिंद्र आणि मारुती हे समभाग बुधवारच्या तेजीच्या बाजारात घसरणीत राहिले. त्या उलट पॉवर ग्रिडचा समभाग सर्वाधिक ३.६८ टक्क्यांनी वाढला. एचडीएफसी बँक १.७१ टक्क्यांनी, एचडीएफसी लिमिटेड १.६६ टक्क्यांनी, टेक महिंद्र १.१३ टक्क्यांनी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ०.९४ टक्के, तर विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रो या सेन्सेक्समधील अन्य समभागांनीही दमदार वाढ साधली. जागतिक आघाडीवर अनेक आव्हाने असतानाही सेन्सेक्सने नवीन सार्वकालिक उच्चांकाला गाठणे हे सर्व बाजार सहभागींसाठी निश्चितच आनंददायी आहे. कंपन्यांकडून जाहीर होणाऱ्या जूनच्या तिमाही निकालांची आता बाजाराला प्रतीक्षा असून, ते एकंदर अपेक्षांच्या अनुरूपच असतील, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे अध्यक्ष राकेश मेहता यांनी मत नोंदवले. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६८ टक्के आणि ०.२४ टक्के असे प्रमुख निर्देशांकापेक्षा सरस प्रमाणात वाढले.

हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

बाजारात तेजी का आहे?

प्रमुख निर्देशांकांची सार्वकालीन उच्चांकी मजल ही जागतिक भांडवली बाजारातील हर्षोल्हासाशी सुसंगत आहे. जगभरातील बहुतांश बाजार हे त्यांच्या ५२ सप्ताहातील उच्चांकी स्तरावर आहेत. गेल्या वर्षी युरोपातील युद्ध, महागाईची चढती कमान, त्याला प्रतिबंध म्हणून सुरू असलेले व्याजदर वाढीचे चक्र, अमेरिकेतील संभाव्य मंदी आणि या सर्वांचा जागतिक विकासावरील परिणाम पाहता जागतिक बाजारांचा वर्षारंभ नरमाईसह झाला होता. एप्रिलपासून भारतीय बाजारांमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात एफआयआयच्या पुनरागमन झाले. त्यांच्यासह देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारावर विश्वासातून अविरत सुरू ठेवलेल्या खरेदी पाठबळाने निर्देशांकांना नवनवीन शिखर गाठता आले, असे एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख एस. रंगनाथन म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्थेत वाढीचे संकेत देणारे प्रमुख निदर्शक तसेच सरकारच्या भांडवली खर्चात सतत वाढीने बाजारातील सकारात्मक वातावरणाला हातभार लावल्याचे त्यांनी सांगितले. “भारतात मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये मोठी गुंतवणूक होत आहे आणि हे चालू राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लार्ज कॅप बँकिंग समभागांचे जरी मूल्यांकन समृद्ध असले तरी चांगला फायदा मिळवून देतात. विशेषत: स्थिर पत वाढ, उच्च दर्जाच्या बँकिंग समभागांसाठीही ते शुभ आहेत,” असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

पुढे चिंता काय असू शकते?

विश्लेषकांनी सांगितले की, व्याजदरातील अनिश्चितता, जागतिक आर्थिक मंदी आणि चलनवाढीच्या समस्यांसारख्या अधूनमधून येणार्‍या अडथळ्यांसह ही एक गुळगुळीत वन वे रॅली होणार नाही. गुंतवणूकदारांसाठी आणखी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे मान्सूनची निराशाजनक कामगिरी आहे, ज्यामध्ये १५ जूनपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक कमतरता दिसून आली आहे. तसेच सर्वच जण डोळे लावून यूएस फेड चेअर जेरोम पॉवेल यांच्या बुधवारपासून सुरू होणार्‍या दोन दिवसीय काँग्रेसच्या बैठकीकडे बघत आहेत. महागाईचा मुद्दा राहिल्यास वर्षाच्या उत्तरार्धात आणखी दरवाढ करण्याचे संकेत फेडने दिल्यामुळे जुलैच्या वाढीबाबतही साशंकता आहे, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले.

वर्षभरातील व्याजदर वाढीसह ते अद्याप पूर्ण झालेले नाही, तर चीन आणि इतर अर्थव्यवस्थांकडून मंदावलेली मागणी पाहता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण यांसारखे इतर नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांना पुढे जाण्यास त्रासदायक ठरू शकतात, असे एका विश्लेषकाने सांगितले. भारतात किरकोळ चलनवाढीचा दर पुन्हा वाढला तर आरबीआयला दरवाढीसह पुन्हा महत्त्वाची पावलं उचलावी लागतील. CPI महागाई २०२३-२४ साठी ५.१ टक्के, Q1 सह ४.६ टक्के, Q2 ५.२ टक्के, Q3 ५.४ टक्के आणि Q4 ५.२ टक्के राहण्याचा अंदाज RBIने वर्तवला आहे.