जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागात खरेदीचा सपाटा लावल्याने सलग तीन सत्रांच्या घसरणीनंतर सेन्सेक्सने मंगळवारच्या सत्रात ४४६ अंशांची उसळी घेतली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे समभाग वधारल्याने प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेमध्ये गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील प्रमुख एचडीएफसीचे विलीनीकरण १ जुलैपासून प्रभावी होईल, अशी घोषणा एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी केली. परिणामी एचडीएफसी समूहातील दोन्ही कंपन्यांचे समभाग तेजीत होते.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
rbi repo rate marathi news
RBI Repo Rate: व्याजदर पुन्हा जैसे थे; सलग ११व्यांदा आरबीआयच्या पतधोरणात बदल नाही!

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४४६.०३ अंशांनी (०.७१ टक्के) वधारून ६३,४१६.०३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४९७.५४ अंशांची कमाई करत ६३,४६७.५४ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १२६.२० अंशांची (०.६८) भर घातली आणि तो १८,८१७.४० पातळीवर स्थिरावला.

हेही वाचाः Adani Group Stocks : हिंडेनबर्गच्या अहवालावर आता गौतम अदाणी म्हणतात…

देशांतर्गत भांडवली बाजारात सलग तीन सत्रानंतर तेजीवाल्यांनी पुन्हा एकदा बाजाराचा ताबा घेतला आहे. एचडीएफसीच्या विलीनीकरणाच्या वृत्तामुळे त्याला अधिक चालना मिळाली. दरम्यान, चीन सरकारकडून अतिरिक्त धोरणात्मक उत्तेजनाच्या आशेने चिनी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मात्र युरोपियन सेंट्रल बँकेने (ईसीबी) महागाई नियंत्रणासाठी अधिक आक्रमक भूमिकेचे समर्थन केल्याने जागतिक पातळीवर संमिश्र कल दिसून आला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचाः महागाईत टोमॅटोचे भाव भरमसाठ वाढले, १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले; जाणून घ्या कारण

सेन्सेक्समध्ये, स्टेट बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे मारुती, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स ६३,४१६.०३ ४४६.०३ ०.७१

निफ्टी १८,८१७.४० १२६.२० ०.६८

डॉलर ८२.०३ -१

तेल ७३.०७ -१.५

Story img Loader