लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: आधीच्या ७ टक्क्यांवरून ७.२ टक्के असा विकासदराबाबत सुधारित आशावादी अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केल्याचे शुक्रवारी भांडवली बाजारात उत्सवी प्रतिबिंब उमटले. प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक उसळलेल्या सप्ताहअखेरच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने नव्या उच्चांकी शिखराला पादाक्रांत केले.

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
stock market today sensex drops 663 point nifty ends below 24200
परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना
elon musk is a donald trump campaigner offers voters 1 million dollar a day
विश्लेषण : इलॉन मस्क बनला डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचारक… ‘लाडक्या मतदारां’ना देतोय १० लाख डॉलर!
Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
sensex fell two month low with 930 points nifty close below 24500
सेन्सेक्स ९३० अंशांच्या गटांगळीसह दोन महिन्यांच्या नीचांकी

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,६१८.८५ अंशांनी वधारून ७६,६९३.३६ अंशांच्या सर्वकालिक उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,७२०.८ अंशांची कमाई करत ७६,७९५.३१ या विक्रमी शिखराला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील ४९८.८ अंशांची कमाई करत २३,३२०.२० अंशांची पातळी गाठली. हा निर्देशांक विक्रमी उच्चांकापासून केवळ १८.५ अंशांनी मागे राहिला. अखेर तो ४६८.७५ अंशांनी वधारून २३,२९०.१५ या पातळीवर विसावला.

आणखी वाचा-‘इक्सिगो’ची बाजाराला धडक; ‘आयपीओ’ १० जूनपासून

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे रेपोदर अपरिवर्तित राखले, विकासाबरोबरच महागाई कमी करण्यावर रिझर्व्ह बँकेने लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रात सत्तेवर येणारे रालोआ सरकार स्थिर राहण्याची अपेक्षा आणि विकासदराचा ७.२ टक्क्यांच्या सुधारित आशावादाने देशांतर्गत भांडवली बाजाराला चालना दिली. परिणामी शेअर बाजाराने नवीन मागील विक्रमी उच्चांकी शिखर गाठले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आणखी वाचा-गुंतवणूकदार १३.२२ लाख कोटींनी श्रीमंत;‘सेन्सेक्स’ची २,३०० अंशांची भरपाई

सेन्सेक्समधील सर्व ३० कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत स्थिरावले. ज्यात महिंद्र अँड महिंद्र, विप्रो, टेक महिंद्र, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि टाटा स्टील यांचे समभाग तेजीत होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप २.१८ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक १.२८ टक्क्यांनी वधारला. सर्व निर्देशांक सकारात्मक पातळीत स्थिरावले. दूरसंचार ३.७८ टक्क्यांनी, माहिती तंत्रज्ञान ३.३८ टक्क्यांनी, तर धातू २.१५ टक्के, ऊर्जा १.९९ टक्क्यांनी वधारले. शुक्रवारी सरलेल्या आठवडाभरात सेन्सेक्सने ३.६९ टक्क्यांनी म्हणजेच २,७३२.०५ अंशांनी वधारला आणि निफ्टीने ७५९.४५ अंशांची म्हणजेच ३.३७ टक्क्यांची वाढ नोंदवली. उपलब्ध माहितीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) विक्रीचा सपाटा सुरू असून, गुरुवारी त्यांनी ६,८६७.७२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७६,६९३.३६ १,६१८.८५ (२.१६%)
निफ्टी २३,२९०.१५ ४६८.७५ (२.०५%)
डॉलर ८३.३९ -१४
तेल ७९.९५ ०.०४