जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि बँकिंग, वित्त आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याने शुक्रवारच्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी पातळीवर विसावले. डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या समभाग खरेदीमुळे निर्देशांकांना अधिक बळ मिळाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४६६.९५ अंशांनी वधारून ६३,३८४.५८ या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकावर स्थिरावला.

दिवसभरात त्याने ६०२.७३ कमाई करत ६३,५२०.३६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी निर्देशांकाने ६३,२८४.१९ अंशांचा उच्चांक गाठला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १३७.९० अंशांची भर घातली आणि तो १८,८२६ अंशांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. या आधी त्याने १८,८१२.५० अंशांची विक्रमी पातळी गाठली होती. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्सने ७५८.९५ अंशांची कमाई केली. म्हणजेच आठवडाभरात तो १.२१ टक्क्यांनी झेपावला आणि तर निफ्टीमध्ये २६२.६ अंशांची (१.४१ टक्के) वाढ झाली.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई
sensex today (3)
दिवाळी ते दिवाळी…वर्षभरात गुंतवणूकदार झाले दीड लाख कोटींनी श्रीमंत!
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांसह बँकिंग, औषधी निर्माण आणि ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदीमुळे तेजीवाल्यांनी पुन्हा एकदा भांडवली बाजाराचा ताबा घेतला आहे. अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे दर्शविणाऱ्या अमेरिकेतील किरकोळ विक्रीच्या आकडेवारीने अमेरिकी बाजाराचा आशावाद वाढला आहे. आयात कमी झाल्याने फेडकडून व्याजदर वाढीला दीर्घकालीन विराम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्हचा समभाग २.२१ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ टायटन, आयटीसी, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग तेजीत होते. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,०८५.५१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

हेही वाचाः Oracle Layoff: ओरॅकल कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय?


रुपयात ३४ पैशांची उसळी; महिन्यातील सर्वोत्तम झेप

भांडवली बाजारातील तेजीवाल्यांच्या सरशीचे अनुकरण करीत शुक्रवारी रुपया ३४ पैशांनी वाढून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत एक महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात रुपयाने ८१.९७ या मजबुतीसह व्यवहाराला सुरुवात केली. सत्रात ८१.८६ चा उच्चांक गाठल्यानंतर दिवसअखेर ३४ पैशांची वाढ नोंदवून रुपया ८१.९४ वर स्थिरावला.

हेही वाचाः ६३ हजार कोटी रुपये : सरकारी कंपन्या इतिहास घडवणार! तिजोरीत विक्रमी डिव्हिडंडची भर टाकणार


सेन्सेक्स ६३,३८४.५८ +४६६.९५ (+०.७४)
निफ्टी १८,८२६ +१३७.९० (+०.७४)
डॉलर ८१.९४ -३४
तेल ७५.२० -०.६२