Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराला आज धमाकेदारपणे सुरुवात झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळे काल अमेरिकन बाजारात विक्रमी वाढ झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येत असून, ते बंपर रॅलीत उघडले आहेत. बाजारात सर्वांगीण वाढीची हिरवी चिन्हे दिसत आहेत आणि सेन्सेक्स-निफ्टी, बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकही ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर उघडले आहेत.
बाजार ओपनिंग कसे होते?
देशांतर्गत बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स ५६१.४९ अंकांच्या म्हणजेच ०.८१ टक्क्यांच्या वाढीसह ७०,१४६ वर उघडला. तर NSE चा निफ्टी १८४.०५ अंकांच्या म्हणजेच ०.८८ टक्क्यांच्या प्रभावी वाढीसह २१,११०.४० वर उघडला.
बँक निफ्टीतही उत्साह संचारला
बाजार उघडल्यानंतर ६२६.३० अंक म्हणजेच १.३३ टक्क्यांचा नवीन उच्चांकासह बँक निफ्टी ४७,७१८ च्या पातळीवर पोहोचला होता, बँक निफ्टीचे सर्व १२ शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते आणि यापैकी बंधन बँक टॉप गेनर लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे.
निफ्टी शेअर्सही वधारले
बाजार उघडल्यानंतर लगेचच निफ्टीच्या ५० पैकी ५० शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. टॉप गेनर्समध्ये एचसीएल टेक २.७४ टक्क्यांनी वाढला आणि टेक महिंद्रा २.४५ टक्क्यांनी वाढला. इन्फोसिस १.९३ टक्के आणि विप्रो १.८९ टक्के मजबुतीसह व्यवहार करत आहे.
क्षेत्रीय निर्देशांकाचे उत्तम चित्र
आयटी क्षेत्रात प्रचंड वाढ दिसून येत आहे आणि आज ३ टक्क्यांपर्यंत उडी दिसू शकते. बाजार उघडताच आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी वाढून ३३७१३ च्या पातळीवर व्यवहार करीत होता.
प्री-ओपनमध्येच बाजार विक्रमी उच्चांकावर होता
बाजार सुरू होण्यापूर्वीच बेंचमार्क निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. मिडकॅप निर्देशांक प्रथमच ४५००० च्या पुढे गेला आहे. बाजार उघडताच निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४०५ अंकांच्या म्हणजेच ०.९० टक्क्यांच्या नेत्रदीपक वाढीच्या पातळीवर पोहोचला होता.