जागतिक शेअर बाजारातील मंदीचा कल आणि मध्यवर्ती बँकांकडून करण्यात येणाऱ्या व्याजदरवाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा निराशेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्यांच्या समभागातील पडझडीने सेन्सेक्स आणि निफ्टीमधील घसरण अधिक वाढली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २५९.५२ अंशांनी (०.४१ टक्के) घसरून ६२,९७९.३७ पातळीवर बंद झाला. दिवसभरात तो ३६४.७७ अंशांनी घसरून ६२,८७४.१२ या सत्रातील नीचांकी पातळीवर घसरला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०५.७५ अंशांची (०.५६ टक्के) घसरण झाली आणि तो १८,६६५.५० अंशांवर स्थिरावला. सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्सने ४०५.२१ अंश गमावले. तर निफ्टीमध्ये १६०.५ अंशांची घसरण झाली. जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा महागाई नियंत्रणावर लक्ष केंद्रित करीत आहेत आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनीदेखील आगामी काळात दरवाढीबाबत भाष्य केले आहे. तर बँक ऑफ इंग्लंडने अनपेक्षितपणे व्याजदरात वाढ करून महागाई त्यांच्या निश्चित लक्ष्य पातळीपर्यंत पोहोचण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’

हेही वाचाः EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय घेण्याची संधी

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सच्या समभागात सर्वाधिक १.७७ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, एनटीपीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, एचडीएफसी आणि सन फार्माचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

हेही वाचाः टाटांच्या TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; कमिशनमध्ये घेतले १०० कोटी, ४ अधिकारी निलंबित