Indian Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आणि ७१ हजारांच्या खाली गेला. तसेच निफ्टीसुद्धा आज १.४ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करीत होता. आज बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही सुमारे ३ टक्क्यांनी घसरले. आजच्या व्यवहारादरम्यान दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

शेअर्सचे बाजारमूल्य ३६६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले

आजच्या व्यवहारादरम्यान निफ्टी ३३३ अंकांनी घसरला आणि २१,२३८ वर बंद झाला. याशिवाय सेन्सेक्स १०५३ अंकांनी घसरला आणि ७०,३७० वर बंद झाला. तसेच निफ्टी बँक १०४३ अंकांनी घसरून ४५,०१५ वर बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे बाजारमूल्य ३६६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. जागतिक बाजारातील सकारात्मक हालचाली पाहता आज देशांतर्गत बाजारात बँकिंग, तेल आणि वायू, एफएमसीजी आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचाः गुजरातच्या ‘किरण जेम्स’ यांची पुन्हा मुंबईवापसी; सूरत डायमंड बोर्स आपली चमक गमावणार

सेन्सेक्स-निफ्टीच्या घसरणीमागील ही ५ मुख्य कारणे

1) HDFC बँक

शेअर बाजारातील आजच्या घसरणीत हेवीवेट काऊंटर एचडीएफसी बँकेचा वाटा जवळपास एक तृतीयांश आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्याने बाजारात विक्री दिसून येत आहे. आजही शेअरमध्ये ३.५७ टक्क्यांची घसरण दिसून आली. तसेच गेल्या ५ दिवसांत हा शेअर १४.४० टक्क्यांनी घसरला. आजच्या व्यवहारादरम्यान केवळ एचडीएफसी बँकच नाही तर निफ्टी बँकही २ टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स ६.५ टक्क्यांनी घसरले आहेत. इंडसइंड बँकेत ५.४९ टक्के, पीएनबीमध्ये ५.५७ टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँकेत ३.९५ टक्के आणि आज एसबीआयच्या शेअर्समध्ये ४.४० टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

हेही वाचाः सोने-चांदी महागले, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मोजावी लागणार जास्तीची किंमत

2) RIL

भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे समभाग २ टक्क्यांनी घसरले आणि आजच्या घसरणीत ते दुसरे सर्वात मोठे कारण ठरले. ग्लोबल ब्रोकरेज Citi ने २९१० च्या टार्गेट किमतीसह स्टॉक न्यूट्रलवर खाली आणला आहे. रिलायन्सच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळे ती सध्याच्या काळासाठी संतुलित आहे. याशिवाय आज बाजारात इतर तेल कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे. आयओसी, एचपीसीएल, अदाणी टोटल गॅस, ऑइल इंडिया, ओएनजीसी, बीपीसीएलसह सर्व समभागांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. तेल कंपन्यांच्या घसरणीचा आणि विक्रीचा परिणामही बाजारावर दिसून येत आहे.

3) FII

गेल्या दोन महिन्यांत सतत खरेदी केल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारां(FII)नी या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून १३ हजार कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली आहे. देशांतर्गत संस्थांनी केलेल्या विक्रीचा परिणामही बाजारावर दिसून येत आहे.

4) प्रॉफिट बुकिंग

याशिवाय बाजारात प्रॉफिट बुकिंगही पाहायला मिळत आहे. गेल्या ३ महिन्यांत निफ्टी ९ टक्क्यांहून अधिक वाढला आहे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात सुमारे १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

5) तांत्रिक तणावाचा परिणाम

याशिवाय निफ्टी मार्केटमध्ये एक वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभराच्या हालचालीत बाजारात घसरण झाली आहे. या विक्रीतून बाजारातील दबाव दिसून येतो, असे नुवामा यांनी म्हटले आहे. तसेच ही विक्री येत्या सत्रांमध्येही सुरू राहू शकते. यापूर्वी निफ्टी २२ हजारांच्या आसपास व्यवहार करीत होता. तसेच आता ते २१,५०० -२१,४५० च्या श्रेणीत व्यापार करू शकते.

Story img Loader