इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या पहिल्या तिमाहीतील कमजोर निकालांचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या (एचयूएल) महसुलात वार्षिक आधारावर ६ टक्क्यांची वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे. शुक्रवारी व्यवहारात HUL चा शेअर ३ टक्क्यांनी घसरला आहे, असंही एचडीएफसी सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे. दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी निफ्टी ५० निर्देशांक १.०६ टक्क्यांनी घसरून १९७६८.०५ वर व्यापार करीत होता. BSE सेन्सेक्स ८०४ अंकांनी म्हणजेच १.२ टक्क्यांनी घसरून ६६७६७.३९ वर व्यवहार करीत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत वाढ अंदाजापेक्षा ३ टक्के कमी आहे. किमतीत कपात केल्याच्या बदल्यात व्यापारातील (१-३ दिवस) स्टॉक पातळी घसरली आणि त्याचा उत्पादनाच्या वाढीवर परिणाम झाला. प्रीमियम पोर्टफोलिओमुळे होम केअर फेब्रिकच्या मागणीने दोन अंकी वाढ साधली, शिवाय ग्राहकपयोगी वस्तूमधील मागणीनेदेखील दोन अंकी वाढ दाखवत चांगली कामगिरी केली. Infosysचा शेअर्स व्यवसायात ७ टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि BSE सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांनी कोसळला, असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घसरण, श्रीमंतांच्या यादीत अंबानी अन् अदाणींचे स्थान काय?

निफ्टी २०,००० अंकापासून थोड्याच अंतरावर असला तरी इन्फोसिसच्या खराब निकालाचा त्यावर परिणाम झाला आहे. Infosys चा आर्थिक वर्ष २०२४ साठी १ ते ३.५ टक्के महसूल वाढीचा खराब अंदाज शेअरच्या घसरणीला कारणीभूत ठरत आहे आणि कदाचित त्यामुळे निफ्टीदेखील घसरत आहे, असंही जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार म्हणालेत.

हेही वाचाः श्रीलंका ते जपान, भारतीय रुपयाला ‘या’ ५ देशांत अनुकूल चलन दर

पहिल्या तिमाहीत केवळ ३ टक्के वाढीसह HUL ची खराब कामगिरी बाजारावर आणखी दबाव आणू शकते. निफ्टीला लवकरच २०,००० च्या पातळीवर नेण्याची क्षमता आहे. तसेच निफ्टी बँकेच्या रॅलीला पाठिंबा देऊ शकतो. अमेरिका वगळता भारत आता जगातील सर्वात महागडी बाजारपेठ आहे. भारतीय बाजारपेठेत काही सुधारणा होऊ शकतात, असंही व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex tumbles by 800 points what is the main reason behind the decline vrd