भारतातील आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) गुरुवारी घोषणा केली आहे. बीएसईने निविदा मार्गाने (टेंडर रूट) ३७५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांच्या पुनर्खरेदीची मंजुरी दिली. प्रत्येकी ८१६ रुपये किमतीला ही पुनर्खरेदी केली जाणार आहे.

बीएसईने यापूर्वी २०१८ सालात १६६ कोटींची आणि २०१९ सालात ४६० कोटींची पुनर्खरेदी करून आपल्या भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे. बीएसईच्या समभागाच्या गुरुवारच्या ७०५.५० रुपये बंद भावाच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिमूल्य भागधारकांना या पुनर्खरेदीतून मिळविता येईल. याआधी कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये एकास दोन समभाग बक्षीस (बोनस) देखील दिले होते.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचाः अदाणी समूहाला आणखी एक झटका; आधी शेअर्स घसरले, आता ‘या’ कंपनीचे मोठे नुकसान झाले

समभाग पुनर्खरेदीअंतर्गत कंपनी शेअरधारकांकडून स्वतःचे समभाग खरेदी करते आणि गुंतवणूकदारांना रोख रक्कम परत देण्याचा हा कर-कार्यक्षम मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. समभाग पुनर्खरेदीमुळे बाजारात उपलब्ध समभागांची संख्या कमी होते आणि त्यामुळे समभागांचे मूल्यवर्धन होते. बीएसईने मार्चमध्ये सरलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २४ टक्क्यांनी वाढ नोंदवत ८८.६१ कोटी रुपयांचा नफा मिळविला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७१.५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

हेही वाचाः आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ; आता घरबसल्या वापरा ‘ही’ सोपी पद्धत!