भारतीय शेअर बाजाराने आज एक नवा विक्रम केला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (८ एप्रिल) शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्सने सर्वाधिक उच्चांक ७४,८६९ तर निफ्टीने २२,७९७ चा सर्वाधिक उच्चांक गाठला. यानंतर सेन्सेक्स ४९४ अंकांच्या वाढीसह ७४,७४२ वर स्थिरावला. तसेच निफ्टी १५२ अकांनी वाढून २२,६६६ वर स्थिरावला. आज ऑईल आणि गॅस तसेच रियल्टी एक टक्क्याने वाढल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीएसईचे बाजार भांडवलदेखील आज १.५५ लाख कोटींनी वाढले आणि ४०० लाख कोटींच्या पुढे सरकरले. ५ एप्रिलला हेच बाजार भांडवल ३९९.३१ लाख कोटी इतके होते. मात्र, आज त्यामध्ये १.५५ लाख कोटींची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. महत्वाची गोष्ट म्हणजे बीएसई बाजार भांडवलामध्ये गेल्या ९ महिन्यांमध्ये जवळपास १०० लाख कोटींची वाढ झाली आहे.

हेही वाचा : तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?

तेजीत असणारे शेअर्स कोणते?

सेन्सेक्स आज ७४,५५५ वर सुरु झाला होता. यानंतर ७४,८६९ च्या उच्चांकावर पोहोचला होता. यामध्ये मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ३.२६ टक्यांनी वाढ झाली. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा ३.२२ टक्यांनी वाढ झाली. एनटीपीसी २.५४ टक्के, जेएसडब्लू स्टील २.३९ टक्यांनी वाढ झाली. तसेच लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स १.९२ टक्यांनी वाढून बंद झाले. याबरोबरच अॅक्सिस बँक, एलटी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल या सर्व शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आली.

कोणते शेअर्स घसरले?

नेस्ले इंडियाचे शेअर्स १.५९ टक्क्यांनी घसरले. विप्रो १.९ टक्के, सन फार्मा द.५१ टक्के, एचसीएल टेक 0.३७ टक्के, टायटन ०.३२ टक्के बंद टक्क्यांनी घसरले.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market sensex and nifty set a new record stock market closing bell marathi news gkt