मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि देशांतर्गत भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने मंगळवारी भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे दिवसअखेर बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> बाजारातील माणसं- नवनीत मुनोत : नवी विटी, नवे राज्य

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार

अत्यंत अस्थिर व्यवहारात, सेन्सेक्स ६८.३६ अंशांची घसरून ६६,४५९.३१ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ६६,६५८.१२ चा उच्चांक आणि ६६,३८८.२६ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टीमध्ये २०.२५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,७३३.५५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> माझा पोर्टफोलियो- उत्पादनांत अनोखेपण, ग्राहकवर्गही नामांकित! : युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड

जागतिक बाजारातील घसरणीचे प्रतिबिंब देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. मात्र अमेरिकी अर्थव्यवस्था पुन्हा पदपथावर येण्याच्या आशेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तसेच देशांतर्गत आघाडीवर वाढलेले वस्तू सेवा कर संकलन आणि निर्मिती प्रक्रियेशी संबंधित निर्देशांक मजबूत राहिला आहे. मात्र अमेरिकेतील पीएमआय आकडेवारी आणि रोजगार आकडेवारी आगामी दिवसातील बाजाराची दिशा निश्चित करेल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीडच्या समभागात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्सचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर याउलट, एनटीपीसी, टेक महिंद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज, महिंद्र अँड महिंद्र, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले.