गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना स्पाईसजेटनं मोठा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेट आपल्या बंद असलेल्या २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात असून या योजनेसाठी स्पाईसजेटनं ४०० कोटी रुपयांचा निधीही गोळा गेल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे स्पाईसजेटच्या या योजनेला गुंतवणूकदारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

हेही वाचा – अदाणींच्या ‘या’ कंपनीचा नफा चौपट वाढला; एका झटक्यात झाली मोठी कमाई

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Mahayutti candidates pressurize to extend the harvesting season Mumbai news
गाळप हंगाम लांबवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा दबाव?

स्पाईसजेट २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू करणार

यासंदर्भात बोलताना स्पाईसजेटचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग म्हणाले, “आम्ही आमच्या बंद असलेल्या २५ विमानांची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आम्ही सरकारच्या इमर्जन्सी क्रेडीट लाईन हमी योजनेतून ४०० कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या योजनेमुळे आगामी काळात कंपनीच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा – विप्रोची १२,००० कोटींची ‘बायबॅक’ योजना; भागधारकांकडून १९ टक्के अधिमूल्याने समभाग खरेदी

गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद

दरम्यान, स्पाईसजेटच्या या योजनेला गुंतवणूकदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज सकाळी स्पाईसजेटच्या शेअर्समध्ये जवळपास पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं बघायला मिळालं. आज सकाळी शेअर बाजार उघडताच स्पाईसजेटच्या शेअर्सच्या किंमतीत ४.८ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३३ रुपये प्रती शेअर्स पर्यंत पोहोचली.

हेही वाचा – अमेरिकेतील आणखी एक बँक बंद; जे पी मॉर्गन आता फर्स्ट रिपब्लिक बँकेची संपत्ती ताब्यात घेणार

गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

वाडिया समूहाच्या मालकीची गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून कंपनीकडे पैशांची कमतरता आहे. यामुळे ते तेल कंपन्यांनी गो फर्स्टला तेल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एअरलाइनची अर्ध्यापेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. तसेच कंपनीने दिवाळखोरीच्या कार्यवाहीसाठीदेखील अर्ज केला आहे.