बाजारात खरेदी-विक्री करणारे हे रोजचे वर्तमानपत्र तरी वाचत असतील? शंकाच आहे. परंतु बाजारात एक असा शेअर दलाल आहे की शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यंत मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा मोतीलालजी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करतात. नुसते वाचत नाहीत तर त्या पुस्तकातील महत्त्वाचे विचार वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात.

राजस्थानात पडू सीवाना बारमे या अत्यंत छोट्या खेडेगावातील एक पोरगेलसा तरुण. वडील धान्य व्यापारी. पण ‘मला वेगळा व्यवसाय करायचा आहे’ असे त्यांना सांगत १५ मे १९६२ ला तो मुलगा मुंबईला येतो आणि येथे सीए बनेपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करतो. मुंबईला आल्यानंतर होस्टेलला राहून सीएचा कोर्स पूर्ण करत असताना रामदेव अगरवाल यांच्याशी मैत्री होते. त्या मैत्रीचे रूपांतर व्यवसाय निर्माण करण्यात केले जाते आणि त्यानंतर मग मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक बाजारातली कंपनी जन्माला आलेली असते.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

आणखी वाचा-वित्तरंजन : नीतिमत्ता वेशीवर टांगणारा – राज राजरत्नम

कथा कादंबऱ्यात जेवढे नाट्य रंगवले जाते त्यापेक्षा प्रत्यक्षात व्यक्तींच्या आयुष्यात अनेक कथा, संघर्ष, चढ-उतार घडत असतात. शेअर बाजारात तर म्हणता म्हणता वेगाने एखादा माणूस खूप मोठा होतो आणि तेवढ्याच वेगाने तो खाली कोसळतो. अनेकांच्या नावाचा उल्लेख करता येईल परंतु तो विषय वेगळा आहे.

शेअर बाजारात सुरुवातीला गुजराथी विरुद्ध मारवाडी असाही संघर्ष झडलेला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी १९८९ ला कंपनी स्थापन केली त्या अगोदर सीए झाल्यानंतर एका ऑडिट फर्ममध्ये नोकरी केली. परंतु त्यांना शेअर बाजाराचे जग खुणावत होते. या बाजारात अनेक चार्टर्ड अकाउंटट्स अयशस्वी ठरलेले आहेत. म्हणून आपण सीए झालो म्हणजे आपल्याला बाजार कळला अशी हवा डोक्यात जाऊ दिली, तर अनेक अनर्थ घडतात. मोतीलाल ओसवाल यांनी शेअर बाजारात उप-दलाल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुदैवाने त्यांना रामदेव अगरवाल साथ देण्यासाठी पुढे आले. ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या (सोमवार, ९ ऑक्टोबर २०२३) या स्तंभातून रामदेव अगरवाल यांच्यावर मागील वर्षी लिहिलेले आहे.

मोतीलालजी आणि रामदेवजी यांची ओळख मोटर सायकलवर लिफ्ट दिल्याने झाली. लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मिळालेल्या या लिफ्टमुळे या दोघांना बाजारात प्रत्यक्षात प्रचंड मोठी लिफ्ट मिळाली. कंपनी स्थापन केल्यानंतर दोघांनीही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. रामदेव अगरवाल यांच्याकडे सुरुवातीला भांडवल नव्हते. परंतु आपल्याला या गुंतवणूक क्षेत्रात मोठे व्हायचे आहे ही जिद्द त्यांच्या ठायी होती आणि मोतीलाल ओसवाल शेअर्स खरेदी-विक्री करण्यात हुशार होते. कॉम्प्युटरचे ज्ञान त्यांना होते त्यामुळे त्यांनी दोघांमध्ये कामाच्या वाटण्या करून घेतल्या. त्यामुळे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचा चेहरा म्हणून रामदेवजी प्रसारमाध्यमात सातत्याने येत असतात. तर खरेदी-विक्रीचे सर्व आर्थिक व्यवहार मोतीलाल ओसवाल सांभाळतात.

आणखी वाचा-गणेश ग्रीन भारतची शुक्रवारपासून प्रत्येकी १८१ ते १९० रुपयांनी भागविक्री

दोन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असताना दोघांनीही पूरक ठरेल असे काम केले. बऱ्याच वेळा आर्थिक कारणामुळे मतभेद होतात आणि त्यामुळे ‘वेगळे व्हायचे मला’ या नाटकाचा प्रयोग होतो, मात्र मोतीलाल ओसवालच्या बाबतीत तसे होणार नाही. तेही खात्रीदायक.

मोतीलाल ओसवाल यांना आतापर्यंत वेगवेगळी बक्षिसे, अवॉर्ड्स मिळाले. या बक्षिसांचे सुरुवातीला आकर्षण वाटते पण त्यानंतर ते आकर्षण राहत नाही. परंतु जे सन्मानपत्र आयुष्यभर मिरवता येईल असे राष्ट्रीय सन्मानपत्र मोतीलाल ओसवाल यांना मिळाले. १९९५ ते १९९९ सर्वात जास्त प्राप्तिकर भरणारे म्हणून त्यांना सन्मानपत्र मिळाले. फक्त एवढ्याच एका सन्मानपत्राचा उल्लेख केला. कारण तो ज्या काळात तो काळ पाहा. शेअर बाजारात तेव्हा अनेक उलटेपालटे व्यवहार चालायचे. तंत्रज्ञानांच्या प्रग़तीमुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता आली. याचे फायदेही अनेक झाले. ज्यांना ज्यांना बाजारात दीर्घकालीन कालावधीत कायम राहायचे आहे अशा व्यक्तींनी बाजार प्रचंड मोठा वाढणार आहे याची स्वतःशी पक्की खूणगाठ बांधून कार्य करण्यास सुरुवात केली.

शेअर दलालाचे कार्यालय हे शेअर बाजाराच्या इमारतीजवळच असले पाहिजे, असा दृष्टिकोन त्यावेळेस शेअर दलालांचा होता. अनेक थोड्या शेअर दलालांपैकी मोतीलाल ओसवाल हे इतरांपेक्षा वेगळे ठरले. त्यांनी स्वतंत्र जागा घेतली आणि बाजारापासून लांब पण सर्व सोयींनी युक्त अशी मोठी इमारत उभी केली. मग त्यांच्या आयुष्यात झालेल्या अनेक बदलांना त्यांना यशस्वीपणे सामोरे जाता आले.

मुंबईचा शेअर दलाल मुंबईच्या बाहेर शाखा उघडण्यास कधीच तयार नव्हता. मोतीलाल ओसवाल यांनी फ्रॅन्चाइजी संकल्पनेचा वापर करून वेगवेगळ्या शहरांमध्ये व्यवहार सुरू केला आणि त्याचा परिणाम असा झाला की, सुरेश लोया, हितल पटेल यांची प्राची इन्व्हेस्टमेंट (नाशिक) वर्षानुवर्षे मोतीलाल ओसवालची भारतातली सर्वात मोठी फ्रॅन्चाइजी ठरली. विश्वास टाकावा लागतो तरच व्यवसाय वाढतो.

आणखी वाचा-निवा बूपा हेल्थ इन्शुरन्सचा ‘आयपीओ’साठी प्रस्ताव

मोतीलाल ओसवाल शांत कधीच बसत नाहीत. त्यामुळे हौसिंग फायनान्स, म्युच्युअल फंड्स, पीएमएस, रियल इस्टेट असे वेगवेगळे विभाग त्यांनी सुरू केले आणि ते चालविलेसुद्धा चांगल्या प्रकारे. विशेषतः मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल हे दोघेही आपल्या म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये स्वतःची गुंतवणूक करतात आणि ती कायम ठेवतात.

मोतीलाल ओसवाल यांनी दोन पुस्तके लिहिलेली आहेत.

१. दि इन्सेस ऑफ बिझनेस ॲण्ड मॅनेजमेंट आणि
२. दि इन्सेस ऑफ लाइफ. अनेक विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. अनेक संस्थांवर ते विश्वस्त म्हणून काम करतात.

Story img Loader