Sensex crashed 700 points : संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कमकुवत झाले आहेत. सेन्सेक्स सुमारे ७०० अंकांनी कोसळला आहे. निफ्टीही २१२५० च्या जवळ आला आहे. आज सकाळी ११ वाजता सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळल्यानं शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स ७०५.२९ अंकांपेक्षा अधिक घसरून ७०,३३७.१४ वर व्यवहार करीत होता. तसेच निफ्टी १९४.२५ अंक म्हणजे -०.९१ टक्क्यांनी घसरून २१,२५९.७० अंकांवर व्यवहार करीत होता. BSE वर सूचीबद्ध शेअर्सचे बाजारमूल्य ३,६९,४१,८०८.९८ कोटी रुपयांवर घसरले. यापूर्वी बुधवारी बाजार भांडवल ३,७१,१८,५००.६२ कोटी रुपये होते. म्हणजेच आज केवळ तीन तासांच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचे १.७७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनापूर्वी सकाळी १०.१५ वाजता सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला होता आणि १०.२० वाजता सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ७०,५४५.४९ वर व्यवहार करीत होता. तसेच शेअर बाजारात सकाळी ९.५८ वाजल्यापासून हा घसरणीचा सिलसिला सुरू झाला. सेन्सेक्स ३०२.६८ अंकांनी म्हणजेच ०.४३ टक्के घसरत ७०,७५७.६३ वर व्यवहार करीत होता. निफ्टी ८२ अंकांनी म्हणजेच ०.३८ टक्क्यांनी घसरून २१,३७१.९५ वर व्यवहार करीत होता.

हेही वाचाः विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!

आजच्या सुरुवातीला शेअर बाजार थोड्या घसरणीने उघडला होता. सेन्सेक्स ३८.२१ अंकांनी म्हणजेच ०.०५ टक्के घसरला आणि ७१,०२२.१० वर उघडला. याशिवाय निफ्टी ३१.६० अंकांच्या म्हणजेच ०.१५ टक्क्यांच्या घसरणीसह २१,४२२.३५ वर उघडला. गुरुवार असल्यानं आज या आठवड्यातील शेवटचा व्यापार दिवस आहे, कारण उद्या शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर बुधवारी बाजारात रिकव्हरी दिसून आली.

हेही वाचाः Health Insurance : आरोग्य विम्याच्या नियमात बदल, आता सर्व रुग्णालयांत मिळणार कॅशलेस उपचार, जाणून घ्या कसे?

शेअर्सची स्थिती

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे शेअर्स सुमारे चार टक्क्यांनी घसरले. एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, विप्रो, अॅक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या समभागांनाही तोटा सहन करावा लागला. इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वाधिक वाढले.इतर आशियाई बाजारांमध्ये चीनचे शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचे हँग सेंग नफ्यात होते, तर जपानचे निक्केई आणि दक्षिण कोरियाचे कोस्पी तोट्यात होते. बुधवारी अमेरिकी बाजार संमिश्र भावाने बंद झाला होता. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३६ टक्क्यांनी वाढून ८०.३३ डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करीत आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी ६,९३४.९३ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market again down sensex crashed 700 points investors lose rs 1 77 lakh crore in just 3 hours vrd
Show comments