भाजपाच्या तीन राज्यांतील विजयानंतर सोमवारी शेअर बाजारातील व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. BSE सेन्सेक्स १,०४९.३१ म्हणजेच १.५५ टक्क्यांच्या वाढीसह ६८,५३०.५० अंकांवर आणि निफ्टी ३१६.७० अंकांच्या म्हणजेच १.५६ टक्क्यांच्या वाढीसह २०,५८४.६० अंकांवर उघडला. बाजाराला मजबूत देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्स ४ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एवढेच नाही तर बीएसईने बाजार उघडताच १५ मिनिटांत ४ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर आपणाला शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविलेल्या निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास तर निफ्टी मिड कॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक मध्ये बंपर वाढ नोंदवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा