निफ्टी निर्देशांकाचे सध्याचे नवनवीन उच्चांकावरचे मार्गक्रमण म्हणजे अनोख्या प्रदेशातील वाटचालच आहे. अशा वेळेला जुन्या घटनांचे दुवे, धागे पकडत वाट शोधणे महत्त्वाचे. यात प्रामुख्याने ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’, निफ्टी निर्देशांकावरील ३०० अंशांच्या परिघाचा धागा पकडत मागील लेखांमध्ये आपण एप्रिलमधील २२,८०० च्या नवीन उच्चांकाचे आलेखन केलेले आहे. हा उच्चांक साध्य झाल्यावर, एक हलकी-फुलकी घसरण २१,८०० पर्यंत येणार अशी सावध सूचना केली होती. तर त्या हर्षोन्मादाच्या भावनेत, ‘असे कसे बोलायचे’ व ही हलकीफुलकी घसरण प्रत्यक्षात आल्यास, तेजीविना निफ्टीला बघायची सवय नसल्याने ‘तुझ्याविना असायचे आता’ असे उसासे गुंतवणूकदारांनी टाकणे स्वाभाविकच. तरी मनातल्या मनात २३,००० च्या उच्चांकाचा धागा मनाशी जोडत रेशमी वस्त्राचं विणकाम करत राह्यचं असेही गुंतवणूकदारांमध्ये नक्कीच सुरू असणार. सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी जेव्हा २३,००० च्या उच्चांकाचा ‘मैलाचा दगड’ साध्य करतानाच्या आनंदी प्रसंगी, गुंतवणूकदारांनी मधल्या काळातील, मन धागा जोडत जे सुंदर नक्षीकाम केलेले भरजरी वस्त्र निफ्टीला भेटवस्तू स्वरूपात देऊन हा आनंदी क्षण साजरा केला. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ७५,४१०.३९ / निफ्टी: २२,९५७.१०
संसदीय राजकारणाचे यशापयश हे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागांवरून ठरते आणि त्या पक्षाचे जनमानसातील स्थान कळते. लोकसभेच्या निवडणुकांचा प्रत्यक्ष निकाल हा आता हाकेच्या अंतरावर असल्याने प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतर निफ्टीच्या वाटचालीवर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे हे जाणून घेण्यासाठी आपण विविध शक्यता तपासून पाहू या
शक्यता १) आता सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळाल्यास निफ्टी निर्देशांक २३,४०० ते २३,७०० च्या उच्चांकाला गवसणी घालेल, काही कालांतराने २४,५०० चा ऐतिहसिक उच्चांक दृष्टिपथात येईल.
शक्यता २) आता विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेसप्रणीत आघाडीला बहुमत मिळाल्यास, निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा परीघ हा २१,३०० ते २३,१०० असेल.
शक्यता ३) त्रिशंकू स्थिती- निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीला कलाटणी मिळत, निफ्टी निर्देशांक २१,३०० ते २०,५०० पर्यंत घसरेल.
‘शिंपल्यातील मोती’
हेही वाचा…‘बीटा’ संकल्पनेचा जन्मदाता : विल्यम शार्प
फेडरल बँक लिमिटेड
(शुक्रवार,२४ मेचा भाव – १६३.२० रु.)
स्वातंत्र्यपूर्व काळात १९३१ साली के. पी. होरमीस यांच्या पुढाकाराने केरळमधील निदम्पुरम येथे या बँकेची सुरुवात झाली. आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारतातील विविध राज्यांतील १,५०४ शाखांमधून, २०१५ एटीएमच्या कार्यप्रणालीतून आर्थिक क्षेत्रात जनतेसाठी कार्यरत असलेली ‘फेडरल बँक लिमिटेड’ या बँकेचा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.
आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास उत्पन्न ५,४५४.६० कोटींवरून ६,७३२.२३ कोटी, करपूर्व नफा १,२१७.९१ कोटींवरून १,२०४.९५ कोटी, तर निव्वळ नफा ९०२.६१ कोटींवरून ९०६.३० कोटी झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता, त्याने आपल्याभोवती १५ रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की १३५, १५०, १६५ रुपये. समभागाचा बाजारभाव सातत्याने १७० रुपयांवर १५ दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे १८५ ते २०० रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे २३० ते २५० रुपये असेल. भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग १५८ ते १५० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १३० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.
निकालपूर्व विश्लेषण
कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल व लोकसभा निवडणुकांचे जाहीर होणारे निकाल हे एकत्रितपणे कंपनीच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करू शकतात. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांना सजग ठेवण्यासाठी जे समभाग पूर्वी या स्तंभात ‘शिंपल्यातील मोती’ या सदरात शिफारस केले होते आणि ते गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणांतर्गत राखून ठेवले आहेत, अशांना येणाऱ्या वादळी उलथापालथीच्या दिवसात या समभागांचा आढावा घेऊन गुंतवणूकदारांना सजग ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने हे निकालपूर्व विश्लेषण…
हेही वाचा…निफ्टीतील सहस्रांशाच्या वाढीत, निवडक पाच समभागांचे ७५ टक्के योगदान
१) एलआयसी ऑफ इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २७ मे
२४ मेचा बंद भाव – १,०२९.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,००० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५० रुपयांपर्यंत घसरण
२) एसएच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २७ मे
२४ मेचा बंद भाव – १९९.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २१३ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २१३ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २३० रुपये, द्वितीय लक्ष्य २४५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: २१३ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १६० रुपयांपर्यंत घसरण
३) ईपीएल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २८ मे
२४ मेचा बंद भाव – १९१.५५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १८५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २१० रुपये, द्वितीय लक्ष्य २२५ रुपये.
ब) निराशादायक निकाल – १८५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १७५ रुपयांपर्यंत घसरण
४) केएनआर कन्स्ट्रक्शन लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार,२९ मे
२४ मेचा बंद भाव – २७१.८०रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २६५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २६५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: २६५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २४० रुपयांपर्यंत घसरण
हेही वाचा…बीएसई सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला ७५,३०० टप्पा, आज १,१०० अंकाची विक्रमी वाढ
५) नोसील लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २९ मे
२४ मेचा बंद भाव – २५७.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २८० रुपये, द्वितीय लक्ष्य ३०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: २५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण
हेही वाचा…सोन्यातील तेजीचा असाही परिणाम; सराफांचे उत्पन्न १७ ते १९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
६) संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २९ मे
२४ मेचा बंद भाव – १४०.१५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १३० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५५ रुपये, द्वितीय लक्ष्य १७० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ११५ रुपयांपर्यंत घसरण
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.