इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत बाजारात पुन्हा खरेदी पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजी आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे ३५० अंकांची वाढ दर्शवली असून, तो ६६,४२४.८६ वर व्यवहार करीत आहे. तर निफ्टी देखील १०० अंकांनी वाढून १९८०० च्या जवळपास पोहोचला आहे. आजच्या व्यवसायात जवळपास प्रत्येक क्षेत्रात खरेदी होताना दिसत आहे. निफ्टीवर बँक, फायनान्शिअल, आयटी, मेटल, एफएमसीजी, ऑटो, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करीत आहेत. सध्या सेन्सेक्स ३५९ अंकांनी वधारत असून, तो ६६४३८ च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. तर निफ्टी ९९ अंकांनी वाढून १९,७८९ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. सेन्सेक्स ३० मधील २९ समभाग हिरव्या रंगात व्यवहार करीत आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये ICICIBANK, LT, AXISBANK, WIPRO, TATAMOTORS, BAJFINANCE यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा