मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने मंगळवारी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांत १ टक्क्याहून अधिक घसरगुंडी दिसून आली. परिणामी ‘सेन्सेक्स’ची ८१,००० अंशांची पातळी मोडीत निघाली.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,०६४.१२ अंशांची घसरण झाली आणि तो १.३० टक्क्यांनी घसरून ८१ हजारांखाली ८०,६८४.४५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने १,१३६.३७ अंश गमावत ८०,६१२.२० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३३२.२५ अंशांनी म्हणजेच १.३५ टक्क्यांनी घसरून २४,३३६ पातळीवर बंद झाला.

One Nation One Election BJP
One Nation One Election : मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loksatta editorial express rti top defaulters bank npa
अग्रलेख: कर्ज कर्तनकाळ!
Mutual Fund Alternative for Investors What is Mutual Fund Lite
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचा नवीन पर्याय, म्युच्युअल फंड लाईट काय आहे?
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
New website to be launched for mutual fund folios
म्युच्युअल फंड फोलिओ सापडत नाही? आता त्यासाठी नवीन वेबसाईट सादर होणार

हेही वाचा >>>घाऊक महागाईतही घसरण; नोव्हेंबरमध्ये तीन महिन्यांतील नीचांकावर

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह, जपानची मध्यवर्ती बँक असलेली बँक ऑफ जपान, बँक ऑफ इंग्लंड या प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरासंबंधी निर्णयांपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. फेडकडून आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर बँक ऑफ जपान, बँक ऑफ इंग्लंडकडून व्याजदर जैसे थे पातळीवर राखले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण कायम आहे. देशाच्या व्यापार तुटीमध्ये दिसून आलेल्या मोठ्या वाढीनेदेखील नकारात्मकतेत भर घातली, असे मत असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>‘एलआयसी’कडे विना-दावे ८८१ कोटी पडून! गत आर्थिक वर्षातील विमाधारकांची दावेरहित रक्कम

सेन्सेक्समधील ब्लूचिप कंपन्यांचे सर्व समभाग नकारात्मक पातळीवर व्यवहार करत बंद झाले. भारती एअरटेल, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. सर्व क्षेत्रीय निर्देशांकात व्यापक घसरण झाली. बीएसईमध्ये दूरसंचार क्षेत्र २.१८ टक्के, धातू १.७७ टक्के, वाहननिर्मिती १.७० टक्के, ऊर्जा १.६४ टक्के, तेल आणि वायू १.५९ टक्के आणि वित्तीय सेवा क्षेत्रात १.३७ टक्क्यांची घसरण झाली.

सेन्सेक्स – ८०,६८४.४५ -१,०६४.१२ -१.३०%

निफ्टी – २४,३३६ -३३२.२५ -१.३५ %

डॉलर – ८४.९० -१ पैसा

तेल – ७३.५८ -०.५०

Story img Loader