गुंतवणूक म्हटली की त्याचे विविध पर्याय आले. यात भांडवली बाजार म्हटलं तर, समभाग, म्युच्युअल फंड, कर्जरोखे त्यात येतात. तर इतर पर्यायांमध्ये जमीन, गृहसंकुलामधील घरांची खरेदी-विक्री, सोने, चांदी व एमसीएक्सवरील गुंतवणूक, असे विविध पर्याय समोर येतात. भांडवली बाजारातील समभागांमधील गुंतवणुकीचा पर्याय हे माध्यम निवडले तर त्याचे यशापयशाचे मोजमाप करण्यासाठी भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा आधार घ्यावा लागतो. आज निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने हा निर्देशांक गुंतवणूकदारांचा ‘जीवश्च कंठश्च मित्र’ झाला आहे. आजच्या धकाधकीच्या, महागाईच्या दिवसांत कायदेशीर पर्यायी उत्पन्न, तसेच आताच्या तरुण पिढीला निवृत्तीनंतर, निवृत्तिवेतन नसल्याने त्याचे नियोजन हे आताच गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘जोडोनिया उत्तम धन व्यवहारे, वापरावे उदास काळे’ अशी गुंतवणूक असावी असे सांगणारी ही माध्यमे तत्त्वज्ञाची भूमिकादेखील वठवत आहेत. हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्री, समभागात, म्युच्युअल फंडातील वृद्धी योजना अशा विविध माध्यमातून गुंतवणुकीचा मार्ग दाखवणारी ही विविध माध्यम वाटाडे / मार्गदर्शकदेखील आहेत. विविध गुंतवणूक पर्यायांना / माध्यमांना ‘मितवा’ या शीर्षकाखाली एकत्र आणणे म्हणजे विविध गुंतवणुकीतील पर्यायांची उत्तम सांगडच. मितवा अर्थात, मि-मित्रत्वाच्या नात्याने, त-तत्त्वज्ञ, वा-वाटाड्या अशा तिन्ही भूमिका ‘मितवा’ अशा गोंडस शब्दात एकत्र आल्या आहेत. दीर्घमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांना, आता चालू असलेल्या नितांत सुंदर तेजीमुळे भांडवल वृद्धी, चांगला परतावा, नफा मिळत असल्याने, ही गुंतवणुकीची विविध माध्यमेच आज गुंतवणूकदारांची ‘मितवा’ झाली आहेत. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा