आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांकाचा गेल्या ११ महिन्यातील वाटचालीचा विचार करता, २० मार्च २०२३च्या १६,८२८ च्या नीचांकापासून,२ फेब्रुवारी २०२४ च्या २२,१२६ च्या उच्चांकापर्यंतची ५,३०० अंशांची सुखद तेजी अनुभवास आली. ही तेजी म्हणजे निफ्टीसाठी ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या स्वरूपाची होती. या प्रवासातील तेजीचा उंच झोका जरी सुखद असला तरी परतीचा मंदीचा झोका मात्र ‘काळजाचा ठोका’ चुकवत होता. या तेजीच्या मार्गावरील धोकादायक वळणावरील सावधानतेच्या सूचना देणाऱ्या पाट्याही अर्थातच होत्या. उदाहरणार्थ, तेजीचा ५,३०० अंशांचा प्रवासाच्या निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीत सध्याचा स्तर ‘महत्वाचा वळणबिंदू’(टर्निंग पाँइट) असून, या स्तरावर निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल अवलंबून असेल. आता तर निफ्टी निर्देशांक उच्चांकासमीपच आहे. त्यामुळे तेजीच्या झोक्याचा उच्चांकबिंदू तर परतीच्या मंदीच्या झोक्याचा ‘काळजाचा ठोका चुकण्याचा स्तर’ काय असेल या सर्व प्रश्नांची विस्तृत उत्तरे जाणून घेण्याअगोदर निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.
शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ७१,५९५.४९ / निफ्टी: २१,७८२.५०

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

डिसेंबरपासून निफ्टी निर्देशांकाचे आलेखन हे २१,५०० ते २१,८००चा परीघ (बँण्ड) डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. निफ्टी निर्देशांकाने २१,८०० चा स्तर पार केल्यास, निफ्टीचा नवीन उच्चांक हा २१,८०० अधिक ३०० अंश म्हणजे २२,१०० असेल. जो २ फेब्रुवारीला २२,१२६ चा उच्चांक नोंदवत साध्य केला गेला. ८ फेब्रुवारीच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर बाजारात जी काही घसरण सुरू झाली आहे त्याची व्याप्ती आज आपण जाणून घेऊया. भविष्यात डोकावण्यासाठी वाचकांसाठी विकसित केलेल्या जुन्या गृहीतकांचाच आधार घेऊया.

हेही वाचा : वित्तरंजन : सीआरबी घोटाळा (भाग १)

१) निफ्टी निर्देशांकाचा ३०० अंशांचा परीघ
२) उच्चांकापासून १,००० अंशांची घसरण.

३) आताच्या घडीला काळाच्या कसोटीवर उतरलेला निफ्टीचा २१,५०० ते २१,८००चा परीघ.
आता चालू असलेल्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २१,५०० ते २१,४०० चा स्तर राखल्यास, निर्देशांकावर ‘हलकीफुलकी घसरण’ शक्य आहे. तरी निफ्टीचे दिवस फुलायचेच असून, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २१,५०० अधिक ३०० अंश २१,८००, २२,१००, २२,४००, २२,७०० असे असतील. यासाठी निफ्टी निर्देशांकाने २१,५०० ते २१,४०० चा स्तर राखणे नितांत गरजेच आहे. ही नाण्याची एक बाजू झाली.

निफ्टी निर्देशांक सातत्याने २१,८०० चा स्तर पार करण्यास व २१,५०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, हा क्षण मंदीच्या झोक्याचा ‘काळजाचा ठोका’ चुकण्याचा स्तर असेल. निफ्टी निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे अशा स्थिती २१,५०० उणे ३००अंश २१,२००, २०,९००, २०,६०० असे असेल.
निफ्टी निर्देशांकांची २१,२०० ते २०,९०० ही खालची लक्ष्य, निफ्टी निर्देशांकांच्या २२,१२६ च्या उच्चांकापासून १,००० अंशाच्या घसरणीशी साधर्म्य दर्शवतात.

‘शिंपल्यातील मोती’
मदरसनसुमी वायरिंग इंडिया लिमिटेड

(शुक्रवार, ९ फेब्रुवारीचा भाव ६८.९५ रु.)

ऊर्जा क्षेत्रात वीज निर्माण करून ती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात विद्युतवाहक तारांना, वायरना अनन्यसाधारण महत्त्व असते. तसेच उत्पादन क्षेत्रात गुणवत्तेची कास धरत, आपली उत्पादने जागतिक दर्जाच्या मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अशोक लेलँड अशा वाहन उद्योगातील कंपन्यांना आपल्या उत्पादनाची सेवा पुरवून आपल्या कंपनीचा ठसा निर्माण करून त्या गुणवत्तेचे गुंतवणूकदारांपर्यंत यशस्वीपणे वहन करणारी ‘मदरसनसुमी वायरिंग इंडिया लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

हेही वाचा : ह्युंडाईची भारतात ‘महा-आयपीओ’ची तयारी; गुंतवणूकदारांकडून तब्बल २५ हजार कोटी उभारण्याचे लक्ष्य

आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री १,६८६.८० कोटींवरून २,११७.२८ कोटी, करपूर्व नफा १४१.४८ कोटींवरून २१८.९९ कोटी, तर निव्वळ नफा १०६.१६ कोटींवरून १६७.८६ कोटी रुपये झाला आहे. मदरसनसुमी वायरिंग लिमिटेड या समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती ६०. ७०. ८० असा १० रुपयांचा परीघ (बँण्ड) निर्माण केलेला आहे. तिमाही निकाल हा नितांत सुंदर असल्याने हा समभाग ६० रुपयांवरून ७५ रुपयांवर, अल्पावधीत वाढल्याने भविष्यातील, ६५ ते ६० रुपयांदरम्यानच्या प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकडयात हा समभाग खरेदी करावा. मदरसनसुमी वायरिंग लिमिटेडचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे ७५ ते ९० रुपये तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य १२० ते १५० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ५५ रुपयांचा स्टाॅप लाॅस ठेवावा.
महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची,अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.

निकालपूर्व विश्लेषण

१) माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, १२ फेब्रुवारी
९ फेब्रुवारीचा बंद भाव- २,११७.४५रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर -२,२०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: २,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८०० रुपयांपर्यंत घसरण.

२) संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, १२ फेब्रुवारी
९ फेब्रुवारीचा बंद भाव- १२१.२५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ११० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ११० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३५ रुपये, द्वितीय लक्ष्य १५० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ११० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९० रुपयांपर्यंत घसरण

३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,१३ फेब्रुवारी
९ फेब्रुवारीचा बंद भाव – ५९१.६० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ५७५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ६५०रुपये.
ब) निराशादायक निकाल: ५७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५५० रुपयांपर्यंत घसरण.

हेही वाचा : Money Mantra : माझा पोर्टफोलियो :  पोर्टफोलियोची शान.. एशियन पेंट्स लिमिटेड

४) आयआरसीटीसी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार,१३ फेब्रुवारी
९ फेब्रुवारीचा बंद भाव -९३९.२०रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ९०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८०० रुपयांपर्यंत घसरण

५) ओएनजीसी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,१३ फेब्रुवारी
९ फेब्रुवारीचा बंद भाव -२६६.९५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २८० रुपये, द्वितीय लक्ष्य ३१५ रुपये.
ब) निराशादायक निकाल: २५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणी इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.