मुंबई : देशांतर्गत आघाडीवर महागाई दराने घेतलेली उसंत आणि त्यापाठोपाठ अमेरिकेतदेखील महागाई दर अपेक्षेपेक्षा चांगला उतार दिसून आल्याने जागतिक पातळीवरील तसेच स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्या परिणामी देशांतर्गत आघाडीवर मंगळवारच्या सत्रातील सेन्सेक्स आणि निफ्टीची दौड बुधवारच्या सत्रातदेखील कायम राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४४.६१ अंशांची कमाई करत ६२,६७७.९१ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ३०१.८१ अंशांची उसळी घेत ६२,८३५.११ पर्यंत मजल मारली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५२.३० अंशांनी वधारून १८,६६०.३० पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये आघाडीच्या कंपन्यांमध्ये टेक मिहद्र, टाटा स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, पॉवरग्रिड, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मंगळवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी ६१९.९२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची नक्त खरेदी केली.
‘फेड’च्या निर्णयाकडे लक्ष
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला महागाई कमी करण्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश आले आणि दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग सावरले. या दोन्ही घटकांच्या एकत्रित परिणामाने सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा जोर राहिला. अमेरिकेत महागाई दर नोव्हेंबरमध्ये ७.१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, जो चालू वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. जून २०२२ मधील ९.१ टक्क्यांच्या चार दशकांतील सर्वोच्च स्तरावरून महागाई दराचा उतार पाहता, अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेतली जाण्याची आशा निर्माण झाली आहे. जगभरातील गुंतवणूकदारांचे गुरुवारच्या अमेरिकेतील पतधोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. महागाई आणि त्यावर मध्यवर्ती बँकांकडून दिली जाणारी प्रतिक्रिया यावर बाजाराची पुढील चाल निश्चित होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
रुपया सावरला
बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी वधारून ८२.४५ पातळीवर स्थिरावला. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलात घसरण आणि इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने रुपयाला बळ मिळाले. परकीय चलन विनिमय मंचावर, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८२.६० या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८२.४० ही उच्चांकी तर ८२.७१ या नीचांकी पातळीला स्पर्श केला.