जागतिक बाजाराच्या कमकुवत ट्रेंडमुळे भारतीय शेअर बाजार १७ जानेवारीला घसरणीसह उघडला. आज म्हणजेच बुधवारी सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE Nifty) मध्ये मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आणि ७२०००च्या खाली गेला. तर निफ्टी २१६५० च्या खाली उघडला. यानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजच्या व्यवहारात शेअर बाजारात विक्रीचा धडाका राहिला. शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दुपारी ३ वाजता सेन्सेक्स १६१९.०५ अंकांनी (२.२१ टक्के) घसरला आणि ७१,५०९.७२ च्या पातळीवर पोहोचला. तसेच या काळात निफ्टी ४६१.४५ अंकांनी (२.०९ टक्के) घसरला आणि २१,५७०.८५ च्या पातळीवर पोहोचला.

हेही वाचाः अदाणी समूह तेलंगणामध्ये १२,४०० कोटींची गुंतवणूक करणार, दावोसमध्ये सामंजस्य करार

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १,३७१.२३ अंकांनी घसरून ७१,७५७.५४ अंकांवर आणि निफ्टी ३९५.३५ अंकांनी घसरून २१,६३६.९५ अंकांवर बंद झाला. तसेच सकाळी ९.१७ च्या सुमारास सेन्सेक्स ७५५.२८ अंकांनी म्हणजेच १.०३ टक्क्यांनी घसरून ७२,३७३.४९ वर आणि निफ्टी २०३.५० अंकांनी म्हणजेच ०.९२ टक्क्यांनी घसरून २१,८२८.८० वर व्यवहार करताना दिसत आहे.

हेही वाचाः अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा? अर्थमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

काही शेअर्स नफ्यात तर काही तोट्यात

आजच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात भारती एअरटेल, इन्फोसिस, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, आयटीसी निफ्टी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली, तर एचडीएफसी बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटो यांना मोठा तोटा सहन करावा लागला.

तिमाही निकालानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले

तिमाही निकालानंतर (Q3 परिणाम) आज HDFC बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून १५८० रुपये झाले. याबरोबरच अॅक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्सही तोट्यात होते. या घसरणीमुळे निफ्टी बँक सुरुवातीच्या व्यवहारात १२०२.४ अंकांनी म्हणजेच २.५० टक्क्यांच्या तोट्यासह व्यवहार करत होती. जर आपण इतर क्षेत्रांबद्दल बोललो तर भांडवली वस्तू आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स नफ्यासह व्यवहार करत आहेत. काल बीएसई सेन्सेक्स ३० शेअर्सवर आधारित १९९.१७ अंकांच्या म्हणजेच ०.२७ टक्क्यांच्या घसरणीसह ७३,१२८.७७ अंकांवर बंद झाला. तर NSE निफ्टी ६५.१५ अंकांनी म्हणजेच ०.२९ टक्क्यांच्या घसरणीसह २२,०३२.३० अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १०८५.७२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.