मुंबई: तयार खाद्यान्नांचा बटवडा आणि द्रुत व्यापार (क्विक-कॉमर्स) क्षेत्रातील कंपनी स्विगी लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक भागविक्रीला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी कंपनीच्या समभागांसाठी केवळ १२ टक्के मागणी नोंदवणारे अर्ज दाखल झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून प्राप्त आकडेवारीनुसार, विक्रीस उपलब्ध केलेल्या १६.०१ कोटी समभागांपैकी, १.८९ कोटी समभागांसाठी बुधवार दिवसअखेर बोली लावली गेली.  किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव समभागांसाठी मात्र ५४ टक्के मागणी नोंदवली गेली, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ६ टक्के भरणा पूर्ण केला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 स्विगीने आयपीओ-पूर्व मंगळवारी सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांना समभाग विकून ५,०८५ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकी ३७१ रुपये ते ३९० रुपयांच्या किंमत श्रेणीत सुरू राहणाऱ्या या समभाग विक्रीतून कंपनीला ११,३२७ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.  
स्विगीने निर्धारीत केलेल्या समभागांच्या किंमतीनुरूप तिचे मूल्यांकन सुमारे ९५,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. जुलै २०२१ मध्ये बाजारात सूचिबद्ध झालेल्या स्विगीची स्पर्धक झोमॅटोचे बाजारमूल्य २.२५ लाख कोटी रुपये आहे.