TATA Group Stocks: टाटा समूहाच्या शेअर बाजारात २८ कंपन्या सूचीबद्ध आहेत, त्यापैकी २४ कंपन्यांनी या आर्थिक वर्षात दुहेरी अंकी परतावा दिला आहे. या समभागांनी गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. मात्र, टाटा समूहाच्या काही समभागांमध्येही घसरणही झाल्याचे पाहायला मिळतेय. आम्ही टाटा समूहाच्या १२ समभागांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा सहा महिन्यांत १५४ टक्के परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या आर्टसन इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअर्सची सध्याची किंमत १६७.८० रुपये आहे, ज्याने एप्रिलपासून १५४ टक्के परतावा दिला आहे, तर सहा महिन्यांत १३८ टक्के परतावा दिला आहे. शुक्रवारी त्याचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी घसरले होते.
हेही वाचाः Money Mantra: घटस्फोटाचा टर्म विम्यावर कशाप्रकारे परिणाम होतो?
टाटा समूहाशी संबंधित गोवा ऑटोमोबाईल कंपनी शुक्रवारी १.४० टक्क्यांच्या वाढीसह १,४९४.९५ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करीत होती. या आर्थिक वर्षात १०५ टक्के परतावा दिला आहे. तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअरची सध्याची किंमत ३,२८५ रुपये आहे, ज्याने या आर्थिक वर्षात ९७ टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे बनारस हॉटेल्स लिमिटेडच्या शेअर्सची किंमत ५,८५० रुपये आहे, जी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७९ टक्क्यांनी वाढली आहे. या आर्थिक वर्षात टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये ७७ टक्के वाढ झाली आहे आणि सध्या ती ९९.४५ रुपयांवर व्यवहार करीत आहे. Tayo Rolls च्या एका शेअरची किंमत सध्या ९१.५० रुपये आहे आणि ती या आर्थिक वर्षात ७६ टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचाः महिंद्रा अँड महिंद्राचा महिलांसाठी विशेष उपक्रम, मिळणार पाच वर्षांची मॅटर्निटी लीव्ह
टाटा समूहातील कंपन्यांमध्ये चालू आर्थिक वर्षात टाटा कम्युनिकेशनचे शेअर्स ५२ टक्क्यांनी वाढले आहेत आणि शुक्रवारी ते प्रति शेअर १,९२५.२० रुपयांवर व्यवहार करीत होते. नेल्को एप्रिलपासून ५० टक्क्यांनी वाढला आहे आणि ७८०.२० रुपयांवर व्यवहार करत आहे. ट्रेंट २,०८२.६५ रुपये प्रति शेअर आहे आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढले आहेत. तेजस नेटवर्क ४८ टक्क्यांनी वाढून ८७४.८० रुपये प्रति शेअरवर व्यवहार करीत होता. TRF ४७ टक्क्यांनी वाढून २३८.५० रुपये प्रति शेअर आहे. टाटा मोटर्सने या आर्थिक वर्षात ४६ टक्क्यांनी वाढ केली आहे आणि प्रति शेअर ६३१ रुपये गाठली आहे.