Tata Motors Target Price: टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या वर्षभरापासून सतत चर्चेत आहेत. बाजारातील मंदीदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज बुधवारी, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली असून ते ६२५.३० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेने बुधवार, ५ मार्च रोजी म्हटले आहे की, “टाटा मोटर्स लिमिटेडचे ​​शेअर्स सध्याच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ३८% ने वाढू शकतात.”

टाटा मोर्टर्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ६०६.२० रुपये आहे, जी कंपनीने या वर्षी ३ मार्च रोजी गाठली होती. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स ४२% ने घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत स्टॉक १७% घसरला आहे.

टार्गेट प्राइज

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेचे टाटा मोटर्सच्या शेअर्सला ‘इक्वल वेट’ रेटिंग दिले आहे. तर टार्गेट प्राइज ८५३ रुपये इतकी ठेवली आहे. दुसरीकडे टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. ही पातळी गेल्या वर्षी जुलैमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सनी गाठलेल्या १,१७९ रुपये या सर्वोच्च पातळीपासून जवळजवळ निम्मी आहे.

भविष्यात टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी…

मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या नोटमध्ये असेही म्हटेल आहे की, “युरोपियन कमिशनचा उद्योग कृती आराखडा ५ मार्च रोजी प्रसिद्ध केला जाईल, जो भविष्यात टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी एक ट्रिगर म्हणून काम करू शकतो. जर या कृती आराखड्यात कार्बन डायऑक्साइड नियमनाबाबत लवचिकता दिसून आली, तर ती टाटा मोटर्सच्या उपकंपनी GLR साठी एक सकारात्मक घटक म्हणून काम करेल.”

विश्लेषक काय म्हणतात?

मॉर्गन स्टॅन्लेने नोटमध्ये लिहिले आहे की, “अमेरिकेत लँड रोव्हरची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ७९% वाढून ११,९०० युनिट्सवर पोहोचली आहे. हे आकडे जानेवारीमध्ये झालेल्या ७०% वाढीपेक्षा आणि डिसेंबरमध्ये झालेल्या ३४% वाढीपेक्षा जास्त आहेत. आर्थिक वर्ष २४ मध्ये जग्वार लँड रोव्हरच्या एकूण विक्रीत अमेरिकन बाजारपेठेचा वाटा २३% होता, तर टाटा मोटर्सच्या एकत्रित विक्रीच्या आकडेवारीत हा वाटा १५% होता.

टाटा मोटर्सच्या शेअर्सचा मागोवा घेणाऱ्या ३४ विश्लेषकांपैकी २० जणांनी या स्टॉकला “बाय” रेटिंग दिले आहे, त्यापैकी नऊ जणांनी “होल्ड”, तर पाच जणांना या स्टॉकवर “सेल” रेटिंग दिले आहे. दुसरीकडे तीन विश्लेषकांनी स्टॉकसाठी १,००० रुपयांपेक्षा जास्त टार्गेट प्राइज ठेवली आहे.

Story img Loader