आठवडाभरानंतर टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले. ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर १३ टक्क्यांनी घसरले. यामुळे कंपनीच्या शेअर्सने ३३२ रुपयांचा उच्चांक गाठला. यामुळेच कंपनीचे बाजार मूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले. आठवडाभरापूर्वी ट्रेंटचे बाजारमूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले होते. टाटा समूहाच्या ६ कंपन्यांचे बाजारमूल्य आता एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
कंपनीचे शेअर्स वाढले
टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. याचे महत्त्वाचे कारण जेएम फायनान्शिअलने शेअरचे रेटिंग अपग्रेड केले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांनी वाढ झाली आणि कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी ३३२ रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होईपर्यंत कंपनीचे शेअर्स १०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ३२५.७५ रुपयांवर आहेत. मात्र, आज कंपनीचे शेअर्स २९५.९० रुपयांवर उघडले. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर्स २९४.१० रुपयांवर बंद झाले होते.
हेही वाचाः Money Mantra : तुमचे बंद असलेले पोस्ट ऑफिस बचत खाते कसे सुरू करायचे? पद्धत जाणून घ्या
बाजार मूल्य १ लाख कोटींच्या पुढे
या वाढीमुळे कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे बाजार मूल्य १,०४,०८८.१९ रुपये आहे. तर एका दिवसापूर्वी कंपनीचे बाजारमूल्य ९३,९७४.९४ कोटी रुपये होते. याचा अर्थ कंपनीच्या बाजार मूल्यामध्ये एका दिवसात १० हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमने उचलले मोठे पाऊल, छोट्या कर्जावर होणार कपात, शेअर २० टक्क्यांनी घसरला
टाटा समूहाचा ‘सिक्सर’
१ लाख कोटींहून अधिक बाजारमूल्य असलेल्या टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये TCS चे नाव आघाडीवर आहे. ज्यांचे बाजार भांडवल १३.२३ लाख कोटी रुपये आहे. टायटन (३.१८ लाख कोटी), टाटा मोटर्स (२.४० लाख कोटी), टाटा स्टील (१.६० लाख कोटी) आणि ट्रेंट (१.०१ लाख कोटी) या कंपन्याही आहेत. गेल्या १२ महिन्यांत टाटा पॉवरने निफ्टीमध्ये ४४ टक्के परतावा दिला आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्सनेही गुरुवारी ७२७.४५ रुपयांचा ५२ आठवड्यांमधील उच्चांक गाठला.