Tata Technologies IPO : जवळपास २० वर्षांनंतर टाटा ग्रुप कंपनीचा IPO येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Technologies चा IPO २२ नोव्हेंबर २०२४ रोजी उघडत आहे. तर गुंतवणूकदार २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सदस्यता घेऊ शकतात. बाजारातील गुंतवणूकदार टाटाच्या या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे आणि या IPO द्वारे समूहाने तिला स्वतंत्र कंपनी म्हणून सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीसुद्धा या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या IPO (Tata Technologies IPO) च्या तपशीलांची माहिती देणार आहोत.

हेही वाचाः विजय माल्ल्या नव्हे, तर ‘ही’ महिला चालवते ४१ हजार कोटींची दारू कंपनी, पगाराचा आकडा पाहून थक्क व्हाल!

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
Loksatta chip charitra Semiconductor industry chip Chinese oppression Xi Jinping
चिप-चरित्र: चिनी दबावतंत्राची निष्पत्ती!
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
govardhan puja 2024 date
Govardhan Puja 2024 : जाणून घ्या गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; गूगलवर ट्रेंड होतोय कीवर्ड
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार

Tata Technologies IPO चे तपशील जाणून घ्या

Tata Technologies चा हा IPO (Tata Technologies IPO Details) पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे येत आहे. म्हणजेच टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ आणि अल्फा टीसी होल्डिंग या इश्यूद्वारे त्यांचे स्टेक विकणार आहेत. या IPO द्वारे एकूण ६०,८५०,२७८ इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. यापैकी ४६,२७५,००० इक्विटी शेअर्स टाटा टेक्नॉलॉजीज विकले जाणार आहेत. ९,७१६,९५३ इक्विटी शेअर्स अल्फा टीसी होल्डिंग आणि ४,८५८,४२५ इक्विटी शेअर्स टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ द्वारे विकले जाणार आहेत. ही सर्व माहिती कंपनीने आपल्या फायलिंगमध्ये शेअर केली आहे. खरं तर कंपनीने ९ मार्च २०२३ रोजी IPO दाखल केला होता.

हेही वाचाः मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या जलमूल्यांकन समितीमध्ये थेट अदाणींचा ‘माणूस’

कंपनी काय करते?

टाटा टेक ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी सेवा तसेच तंत्रज्ञानावर आधारित उपाय पुरवते. ही कंपनी एरोस्पेस, यंत्रसामग्री आणि वाहतुकीसाठी तिच्या सेवा पुरवते. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास २०२३ च्या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई २५ टक्क्यांनी वाढून ४४१८ कोटी रुपये झाली आहे. कंपनीचा नफा ७०८ कोटी रुपये होता, ज्यामध्ये सुमारे ६३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.