आशीष ठाकूर

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ६१,३३७.८१ / निफ्टी: १८,२६९.००

गेल्या लेखातील वाक्य होते… ‘सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकावर १८,८८७ वरून १८,४०० पर्यंतची हलकी-फुलकी घसरण चालू आहे. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर राखल्यास हा निर्देशांक पुन्हा १८,६०० ते १८,९०० वर झेपावेल.’ आता हेच वाक्य सखोल, विस्तृतपणे तपासून निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या. तसेच गेल्या लेखातील प्रमेय क्रमांक – ३ अर्थात ‘निफ्टी निर्देशांकाचा ३०० अंशांचा परीघ’ या जुन्या प्रमेयाची वैधता आताच्या घडीला तपासून, ती आजही काळाच्या कसोटीवर उतरते का ते बघू या.
सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाच्या १८,४०० ते १८,६०० च्या परिघाला (बॅण्डला) अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. किंबहुना हा तेजी अथवा मंदीचा वळणबिंदू (टर्निंग पाॅईंट) असणार आहे. जसे की निफ्टी निर्देशांक १८,६०० च्या स्तरावर सातत्याने पाच दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,६०० अधिक ३०० अंशांचा परीघ १८,९०० ते १९,२०० असे निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.

निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,६०० पार करण्यास आणि १८,४०० चा स्तर राखण्यासदेखील अपयशी ठरत असल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १८,४०० उणे ३०० अंश १८,१०० ते १७,८०० असे असेल.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

शिंपल्यातील मोती

रुग्णालयातील जीवरक्षक प्रणालीवर (व्हेन्टिलेटर) असलेल्या रुग्णाच्या जरी प्रकृतीत सुधारणा झाली तरी, त्या रुग्णाला अतिदक्षता विभागातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही काळ ठेवले जाते. कारण रुग्ण हा अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आलेला असतो. त्याच्या शरीरातील अवयवांची हालचालदेखील त्या रुग्णाला कष्टप्रद असते. तद्वत ही बाब ‘संगणक, माहिती-तंत्रज्ञान’ क्षेत्रालाही लागू पडते. ही पार्श्वभूमी असल्याने दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी प्रत्येक घसरण ही या क्षेत्रातील समभाग खरेदीची सुवर्णसंधी निश्चितच आहे. त्यासाठी गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत (थेंबे थेंबे तळे साचे, एसआयपी धाटणीने) प्रत्येक घसरणीत या क्षेत्रातील समभाग दीर्घ मुदतीकरिता खरेदी करावेत.

हे सूत्र नेहमी अवलंबावे. कारण निफ्टी निर्देशांकावर जे काही घातक उतार संभवतात त्यातून हे क्षेत्रदेखील प्रभावित होऊ शकते. पण जेव्हा सेन्सेक्स एक लाख आणि निफ्टी निर्देशांक २८,००० ते ३३,००० असेल तेव्हा आता ‘बुडत्याचा पाय खोलात’ असलेले हे क्षेत्र व या क्षेत्रातील समभाग आपल्याला आकर्षक परतावा देऊ शकतील. तेव्हा या ‘शिंपल्यातील मोती’ या सदराकडे दीर्घ मुदतीची, संपत्ती निर्माण करणारी गुंतवणूक (वेल्थ क्रिएशन) म्हणून बघावे, तर अल्प मुदतीच्या परताव्यासाठी निकालपूर्व विश्लेषण सदराचा आधार घ्यावा.

सद्य:स्थितीत ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्र’ हे मंदी प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आता कुठलीही कंपनी चांगली की वाईट हे तिच्या आर्थिक कामगिरीवरून जोखले पाहिजे. ज्या कंपनीचा डॉलर चलनातील उत्पन्नाचा वार्षिक वृद्धिदर हा ४० टक्के आहे, तर सप्टेंबर तिमाहीचा वृद्धिदर हा ५.८ टक्के आहे, तर रुपयातील उत्पन्नाचा वार्षिक वृद्धिदर हा ५१.६ टक्के आहे, तर सप्टेंबर तिमाहीचा वृद्धिदर हा ९.१ टक्के आहे. करपूर्व नफ्याचा वार्षिक वृद्धिदर हा ३५.८ टक्के आहे, तर सप्टेंबर तिमाहीचा वृद्धिदर हा ४.९ टक्के आहे, तर निव्वळ नफ्याचा वार्षिक वृद्धिदर हा ३६ टक्के आहे, तर सप्टेंबर तिमाहीचा वृद्धिदर हा ४ टक्के आहे… अशी वित्तीय कामगिरी करणारी ‘पर्सीस्टंट सिस्टीम लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे. (शुक्रवार दि. १६ डिसेंबरचा बंद भाव ३,९६८ रुपये आहे)

कंपनीच्या/ आस्थापनाच्या गरजेनुसार त्यांना माहिती-तंत्रज्ञान उपाययोजना पुरवणारी ही कंपनी आहे. यातील सर्वात मोठा धोका हा विषाणूचा (व्हायरस) असून त्यामुळे संपूर्ण माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा निकामी होण्याची शक्यता असते. या कारणाने तो व्हायरस ओळखून त्याचा हल्ला निकामी करून माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा सक्षम राखणे अशी विविध स्तरांवर काम करणारी ही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर काम करणारी कंपनी आहे.

समभागाच्या किमतीच्या वाटचालीच्या अंतरंगात डोकावता समभाग ३०० अंशाच्या परिघात वाटचाल करतो जसे की रुपये ३०००… ३,३००… ३,६००… ३,९००… ४,२००… ४,५०० अशी वाटचाल करत समभागाचे ५,००० रुपये हे अल्प मुदतीचे, तर ६,००० रुपये हे दीर्घ मुदतीचे लक्ष्य असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २,९०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

(क्रमशः)

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ (टार्गेट प्राइस) या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader