देशांतर्गत शेअर बाजारातील उत्साही वातावरणामुळे दररोज नवनवे विक्रम निर्माण होत आहेत. ऐतिहासिक आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही नवा विक्रम नोंदवला गेला आणि हा विक्रम बँक निफ्टी निर्देशांकाने केला. शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्देशांकाने ही पातळी गाठली

व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने १ टक्क्यानं उसळी घेत ४७,३०३.६५ अंकांची पातळी गाठली. बँक निफ्टीची ही नवीन उच्च पातळी आहे. बँक निफ्टी निर्देशांक या आठवड्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जुलै २०२२ नंतर बँकिंग निर्देशांकाचा हा सर्वात मोठा साप्ताहिक नफा आहे. यावर्षी बँकिंग निर्देशांक ९ टक्क्यांनी वाढला आहे. वार्षिक आधारावर बँकिंग निर्देशांक बेंचमार्क निफ्टी ५० पेक्षा कमी आहे, ज्याने यावर्षी आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने ०.९ टक्क्यानं उसळी घेत ४७२६२ अंकांची पातळीवर बंद झाला.

हेही वाचाः UK Global Investors Summit 2023 : बाबा रामदेव १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे मदत मिळाली

शेअर बाजाराच्या एकूण तेजीचा बँकिंग निर्देशांकाला फायदा होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निकाल जाहीर झाल्याने बँकिंग निर्देशांकाला पाठिंबा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाच्या घोषणेनंतर बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.

हेही वाचाः मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली बंदी

अशा प्रकारे बँकिंग शेअर्स वधारले

जर आपण बँकिंग समभागांवर नजर टाकली तर या आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे. बँक ऑफ बडोदाने आठवड्यात सर्वाधिक १० टक्के वाढ नोंदवली आहे. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांनी वाढले आहेत, तर आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या समभागांनी आठवड्यात प्रत्येकी ५ टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

या कारणांमुळे पाठिंबा मिळत आहे

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर देशांतर्गत बाजारात बंपर तेजी पाहायला मिळत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाचपैकी तीन राज्यांमध्ये बहुमत मिळाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी ५ डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला होता, त्या दिवशीही बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला होता, जो आज रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर बँक निफ्टी निर्देशांकाने ओलांडला होता.

देशांतर्गत बाजारपेठेत वाढ सुरू आहे

देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजार ग्रीन झोनमध्ये आहे. दुपारी १२.२० वाजता बीएसई सेन्सेक्स २२० अंकांच्या म्हणजेच सुमारे ०.३२ टक्क्यांच्या वाढीसह ६९,७४० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर NSE निफ्टी ५० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह २१ हजार अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. आठवडाभरात निफ्टीनेही २१ हजार अंकांची पातळी ओलांडली आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bank nifty index reached a new high with the excitement in the stock market creating a new history vrd