हैदराबाद येथे ५ जुलै १९६० ला राकेश झुनझुनवाला यांचा जन्म झाला. १४ ऑगस्ट २०२२ या दिवशी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. परंतु फक्त ६२ वर्षांच्या आयुष्यात राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात जे कमावले, ज्या पद्धतीने कमावले तसे कोणालाही करता येणार नाही. म्हणूनच लेखाचा मथळा ‘असा राकेश पुन्हा होणे नाही’ असा योजला. जर हयात असते तर… हिंदी चित्रपटात जसा फ्लॅशबॅक असतो तसा तो डोळ्यासमोरून तरळून गेला.

स्थळ- पार्ल्यातील प्रसिद्ध सभागृह, वक्ते- मोतीलाल ओसवाल, राकेश झुनझुनवाला आणि त्यानंतर अस्मदिकांचा विषय म्युच्युअल फंड्स. राकेश झुनझुनवाला थांबायला तयार नव्हते. त्यांना थांबायला वेळ नव्हता. ‘फक्त १० मिनिटे थांबा, नंतर मग गेलात तरी चालेल,’ अशा विनवणीनंतर, चक्क त्यांनी निर्णय बदलला. सभा यथासांग संपली. त्यानंतर वार्तालाप चालू असताना एक प्रश्न त्यांना विचारला. एखादा गुंतवणूकदार, हा गुंतवणूकदार आहे की सटोडिया हे ठरविण्याचा अधिकार प्राप्तीकर खात्याने त्या काळी स्वतःकडे ठेवला होता. जर त्या व्यक्तीला प्राप्तीकर खात्याने शेअर ट्रेडर म्हणून ठरविले तर मग त्या व्यक्तीला दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील सवलती मिळायच्या नाही आणि शेअर खरेदी विक्रीचे उत्पन्न हे ट्रेडिंग प्रॉफिट म्हणून विचारात घेण्याचा अधिकार प्राप्तीकर विभागाला होता. प्रश्न हा की, ‘याला काही पर्याय आहे का?’

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा…खरेच शेअर बाजार महाग आहेत?

ताबडतोब राकेशजीकडून उत्तर आले, ‘एका व्यक्तीने एकच डिमॅट खाते उघडले पाहिजे, असा कोणताही नियम नाही. एक डिमॅट खाते ट्रेडिंगसाठी ठेवायचे आणि दुसरे खाते गुंतवणुकीसाठी ठेवायचे. मग जे गुंतवणुकीचे खाते आहे त्यातून शेअर्सची विक्री केली तर दीर्घकालीन भांडवली लाभ फायदे घेता येतात.’

‘तुम्ही हे सांगता ते खरे कशावरून मानायचे?’ या प्रश्नांला उत्तर मिळाले – ‘माझे वडील प्राप्तीकर आयुक्त होते आणि मीसुद्धा गुंतवणूक आणि ट्रेडिंग अशी दोन वेगवेगळी डिमॅट खाती ठेवलेली आहेत.’ पहिल्या भेटीतच राकेश झुनझुनवाला ही अशी छाप सोडून गेले.

प्रसंग दुसरा. स्थळ- सहारा स्टार हॉटेल, रोटरी कॉन्फरन्स, वक्ते – राकेश झुनझुनवाला. संयोजकांनी जाहीर केले – फारच कमी वेळ उपलब्ध आहे, फक्त निवडक प्रश्नांनाच उत्तरे मिळतील. मुद्दामच प्रश्न असा विचारला की, त्या प्रश्नांत राकेशजींचा हजरजबाबीपणा दिसून यावा. अपेक्षेप्रमाणे प्रश्नाला त्यावरील उत्तराला दोन्हींना टाळ्या मिळाल्या. प्रश्न होता- ‘पंतप्रधानांनी तुम्हाला बोलावले व फायनान्स मिनिस्टर व्हा अशी ऑफर दिली तर काय कराल?’ त्वरित मजेशीर उत्तर आले – ‘मी माझ्या होम मिनिस्टरला विचारेन.’ सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लिफ्टने खाली आल्यानंतर त्यांचे वाहन येईपर्यंत पुन्हा गप्पा झाल्या आणि त्यानंतर अनेक कार्यक्रमांना भेटीगाठी होत राहिल्या.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : हवेत थंडाव्याचा स्वरसंघ, सिम्फनी लिमिटेड

‘शेअर गुंतवणुकीत राकेश झुनझुनवाला हा आदर्श ठेऊ नका. मी एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले म्हणून ते तुम्ही घेतलेच पाहिजेत, असे अजिबात नाही. स्वतः शेअर्सचा शोध घ्या. मी शेअर्समध्ये पैसा कमावला. पण अनेक शेअर्समध्ये मी प्रचंड फटकेसुद्धा खाल्ले आहेत. भांडवली बाजार ही जगातील सर्वात महागडी संस्था आहे. ती तुम्हाला प्रशिक्षण देते, परंतु त्या प्रशिक्षणाची फीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वसूल करते.’

अनेक वाचकांना माहिती नसेल, परंतु ज्यावेळेस हर्षद मेहताने ज्या शेअर्समध्ये पैसा कमावला, त्या शेअर्समध्ये मंदी करून राकेश झुनझुनवाला यांनी प्रचंड पैसा गमावला होता. पण बाजारात पुन्हा उभे राहावेच लागते.

राकेशजींनी शेअर बाजारात भरपूर पैसा कमावला तरी आई मागे लागत होती. स्वतःचे मालकीचे मोठे घर घेतलेच पाहिजे. शेवटी आईचा हट्ट पुरा करायचा म्हणून राकेशजींनी आपल्याकडचे शेअर्स विकले. त्या शेअर्समध्ये क्रिसिल लिमिटेडच्या शेअर्सचीही विक्री केली. अर्थातच ज्या शेअर्सची विक्री केली त्याची नंतर किंमत प्रचंड वाढली.

थोडासा उल्लेख या संबंधाने क्रिसिलचा करावा लागेल. क्रिसिलची स्थापना प्रदीप शहा यांनी केली. त्या अगोदर ते एचडीएफसी लिमिटेड या कंपनीत नोकरी करीत होते. एच. टी. पारिख यांनी आपल्या पुतण्याला दीपक पारिख यांना जेव्हा एचडीएफसीमध्ये आणले तेव्हा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असे सांगून प्रदीप शहा यांनी एचडीएफसी सोडली. पुढे काय करणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले – मी एका वेगळ्या प्रकारच्या संस्थेला जन्म देण्याच्या प्रयत्नात आहे. ही संस्था म्हणजे क्रिसिल लिमिटेड. ही कंपनी अगोदर कोणाला समजली नाही. राकेश झुनझुनवाला यांना समजली आणि त्या कंपनीत गुंतवणूक करून त्यांनी प्रचंड पैसा कमावला.

हेही वाचा…नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ८० हजारांखाली; निर्देशांक विक्रमी उच्चांकी पातळीपासून माघारी 

बाजारातली तेजी यावर राकेश झुनझुनवाला आपल्या विचारसरणीशी एवढे ठाम होते की, त्यामुळे त्यांना तेजीचा बादशहा अशी पदवी मिळाली होती. त्यांच्यासमोर कोणताही मंदीवाला तग धरून ठेऊ शकत नव्हता. अतिशय कमी कालावधीमध्ये ५० हजार कोटी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले. हे उभे करत असताना काही वेळा अडचणी सुद्धा आल्या. काही व्यवहारामध्ये सेबीला दंड म्हणून काही रक्कम भरावी लागली. परंतु तो विषय फार मोठा आणि वेगळा आहे. अमेरिकन भांडवली बाजारातसुद्धा असे प्रकार घडतात.

सामान्य गुंतवणूकदारांनी राकेश झुनझुनवाला यांचे काही नियम पाळायलाच हवे.

१) भाव ‘भगवान’ आहे. २) गुंतवणूक दीर्घकालीन असायला हवी. ३) बाजाराचा ‘रिस्पेक्ट’ ठेवा. ४) आपण काय पणाला लावायचे आहे आणि त्याच बरोबर दोन पावलं मागे येण्याची तयारी ठेवा. ५) मागे येताना जर काही फटका बसला तर तो सहन करायची ताकद ठेवा. ६) गुंतवणुकीच्या विश्वात भावना बाजूला ठेवावी लागते. भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक केली किंवा विक्री केली नाही तर फटका बसणारच बाजार अतिशय क्रूर आहे. बाजाराला दया माया नसते. ७)आपल्या हातून चुका झाल्या तर त्यातून सुद्धा काही ना काही शिकवण मिळते. ८) अपयश हा सुद्धा आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. ९) तुम्ही जर अपयश सहन केले नाही आणि त्यातून काही शिकले नाही तर तुमच्यात काही बदलच होणार नाही.

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी हार मानली नाही. १९८७ ला दोघांचे लग्न झालेले होते. रेअर एंटरप्रायझेस लिमिटेड ही त्यांची कंपनी अस्तित्वात आहे. आकासा एअर ही कंपनी एका वेगळ्या व्यवसायात प्रयत्न करीत आहे. राकेश झुनझुनवाला यांनी म्युच्युअल फंड्स चालविण्यासाठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना करायला हवी होती. जर त्यांच्या फंडाने विविध योजना आणल्या असत्या तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता.

हेही वाचा…Stock Market Update: ‘सेन्सेक्स’चे चार शतकी तेजीसह विक्रमी शिखर

निमेश कम्पानीकडे नोकरीला असलेले हेमेंद्र सेठ यांनी स्वतःची शेअर दलालाची पेढी सुरु केली. त्यांचा मुलगा उत्पल सेठ हा राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. त्याने मात्र म्युच्युअल फंड – ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली. राकेश झुनझुनवाला यांचे अकाली निधन झाले. पैसा कमावताना तब्येत चांगली ठेवणेही आवश्यक, हेही तितकेच खरे.

Story img Loader