मुंबई : भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने बुधवारच्या सत्रात प्रथमच ८०,००० अंशांची ऐतिहासिक पातळी ओलांडली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १६२ अंशांची भर घालत नवीन अत्युच्च शिखर गाठले. बँका आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांतील झालेल्या दमदार खरेदीच्या जोरावर निर्देशांकांनी ही उच्चांकी झेप घेतली.

बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने ६३२.८५ अंशांची कमाई करत ८०,०७४.३० या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. बाजार बंद होताना निर्देशांक किंचित खाली येत, ५४५.३५ अंशांच्या वाढीसह ७९,९८६.८० पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने १६२.६५ अंशांची भर घातली आणि तो २४,२८६.५० या सार्वकालिक उच्चांकावर स्थिरावला.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Rizwan Sajan Success Story
Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार

देशांतर्गत भांडवली बाजारात लार्ज कॅप कंपन्यांच्या संमभागांमुळे व्यापक तेजी दिसून आली. बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण हे १२ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. परिणामी नजीकच्या काळात वित्तीय क्षेत्रच बाजार तेजीचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू होणार असून त्यातून आगामी व्याजदर कपातीसंबंधाने ठोस संकेत मिळण्याची शक्यता आहे. हे सर्व आशावादी घटक निर्देशांकांच्या विक्रमी मुसंडीस कारणीभूत ठरले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>पुढील दशक उत्पादन क्षेत्राचे, डीएसपी म्युच्युअल फंडाचा आशावाद

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स आणि टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात २०००.१२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

बाजार भांडवल ४४५.४३ लाख कोटींवर

मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईमधील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ४४५.४३ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बुधवारी पोहोचले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८०,००० अंशांची पातळी गाठल्यानंतर बीएसईचे बाजार भांडवल ५.३३ ट्रिलियनच्या विक्रमी शिखरावर पोहोचले.

अवघ्या सात महिन्यांत १०,००० अंशांची भर

गतवर्षी ११ डिसेंबर २०२३ ला सेन्सेक्सने ७०,०५८ अंशांची पातळी पहिल्यांदा गाठली होती. तर अवघ्या सात महिन्यांच्या आत म्हणजे ३ जुलै २०२४ रोजी ८०,०७४ अंशांच्या पातळीला निर्देशांकाने स्पर्श केला. निर्देशांकाची ही १० हजार अंशांचा पल्ला गाठणारी सर्वात वेगवान कामगिरी आहे. विद्यमान वर्षातही, ९ एप्रिल २०२४ रोजी सेन्सेक्सने ७५,००० अंशांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. सरलेल्या महिन्यात २५ जूनला त्याने ७८,००० अंशांची पातळी गाठली, तर नंतरच्या दोन कामकाज सत्रांतच म्हणजे २७ जूनला तो ७९,००० अंशाच्या पातळीवरही पोहोचला होता.

सेन्सेक्स ७९,९८६.८० -५४५.३५ (-०.६९%)

निफ्टी २४,२८६.५० -१६२.६५ (-०.६७%)

डॉलर ८३.५२ ४

तेल ८६.३२ -०.०९

Story img Loader