सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचे एक वाक्य आहे. ‘In the Long Run We Are All Dead’ याचाच अर्थ बाजाराचा फार दीर्घकालीन विचार करू नका. तुम्हाला त्याचे रंग आणि ढंग बदललेले पाहायला मिळू शकतात. भारतातील ‘इक्विटी’ बाजारांमध्ये गुंतवणूक आणि व्यवहार करणाऱ्या, प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) नशीब अजमावणाऱ्या आणि नव्यानेच म्युच्युअल फंड या माध्यमातून बाजारात दाखल झालेल्या अशा सर्वांनाच बाजाराने गेल्या बारा महिन्यांत खरोखरीच विविध बाजाररंग दाखवले.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर बाजारात उत्साह परतला होता. सरकारची धोरणे अर्थातच बाजाराला पाठिंबा देणारी होती, पण वर्ष २०२० मध्ये आलेल्या करोनाच्या संकटाने जागतिक बाजारांची दिशा बदलून टाकली. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये झालेली हानी भरून निघणे खूपच कठीण आहे, असा सूर तज्ज्ञांनी लावायला सुरुवात केली होती. मात्र वर्षभरातच भारतीय बाजारपेठेने आणि शेअर बाजारांनी हे सगळे संकेत खोटे ठरवत स्पष्टपणे वरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. तशीच काहीशी स्थिती या वर्षाच्या सुरुवातीला होती.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

हेही वाचा – माझा पोर्टफोलिओ: स्मॉलकॅप क्षेत्रातील ‘ऊर्जावान’ स्रोत; होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड

भारतातील व एकंदरीतच जागतिक पातळीवरील वाढलेली महागाई, मागच्या वर्षी जमा झालेले रशिया-युक्रेन युद्धाचे ढग या पार्श्वभूमीवर निफ्टी वर्षभरापूर्वी १६,८०० ते १६,९०० या पातळीवर होता. बाजारपेठेतील जोखीम आणि परतावा याचे गणित पाहता निफ्टी किती वाढेल? अशी शंका गुंतवणूकदारांच्या मनात होती. गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, फेब्रुवारी २०२१ मध्ये असे विधान केले होते की “२०३० पर्यंत निफ्टीने ९०,००० ते १,००,००० ही पातळी गाठली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ते आता आपल्यात नसले तरी गेल्या वर्षभरातील बाजाराचा विस्तार लक्षात घेता त्यांचे भाकीत निम्म्याने जरी प्रत्यक्षात उतरले तरी गुंतवणूकदारांना किती घसघशीत फायदा होईल याची नुसती कल्पना केलेली बरी. या सदराला वर्षभरापूर्वी सुरुवात करताना १९,००० च्या आत असलेला निफ्टी हा लेख लिहिताना २१,४०० या पातळीवर विराजमान झाला आहे.

तेजीत कोणाचा समावेश?

भारतातील भांडवली बाजारामध्ये कायमच माहिती तंत्रज्ञान, बँका आणि वित्तीय संस्था यांचा बाजार वरच्या दिशेने नेण्यात मोलाचा हातभार असतो. मात्र या वर्षीचे चित्र काहीसे वेगळे होते. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील कंपन्यांमध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहेच, पण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये जी ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली ती दुर्लक्षित करून चालणार नाही. बीएसई पीएसयू निर्देशांकामध्ये वर्षभरात ४५ टक्के वाढ झाली आहे. ती निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षाही अधिक आहे. पन्नासहून अधिक कंपन्यांनी दोन अंकी वाढ दर्शवली आहे. रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या शेअरमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रेल विकास निगम, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन या कंपन्यांचा वाढता आलेख थक्क करून सोडणारा आहे.

खर्च आवडे सर्वांना…

येते वर्ष लोकसभा निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारने भर दिला आहे. देशातील असा एखादा प्रदेश नाही किंवा एखादे क्षेत्र नाही की, ज्यामध्ये सरकारी खर्च वाढलेला दिसत नाही व याचा थेट लाभ बाजारातील मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांना होताना दिसतो आहे.

संरक्षण क्षेत्राचे वाढते महत्त्व

फक्त देशाअंतर्गत आणि देशांच्या सीमेच्या सुरक्षेसाठीच शस्त्रसज्जता असे सरकारी धोरण आता उरलेले नाही. याउलट सरकारने भूराजकीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्यापारी सुरक्षा साध्य करण्यासाठी संरक्षणाचा विचार करायला सुरुवात केली आहे. जसजसा भारताचा आशिया प्रशांत क्षेत्र आणि युरोप आफ्रिकेशी होणारा व्यापार वाढेल तसे सागरी सुरक्षेचे महत्त्व वाढणार आहे. शस्त्रास्त्र आणि एकूणच संरक्षणविषयक उत्पादने, तंत्रज्ञान, सुटे भाग यांची आयात करणारा देश ही प्रतिमा हळूहळू बदलून निर्यात करू शकणारा देश अशी प्रतिमा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण आशियातील पुरवठा साखळीचा भारत हक्काचा साथीदार बनायची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतामध्ये सेमीकंडक्टरसारखी उत्पादने तयार होण्यासाठी जोरदार प्रयत्न होणे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यात स्वारस्य दाखवणे ही सुचिन्हे आहेत. काही जणांना हा वेग अत्यंत लहान वाटत आहे, पण मोठे बदल हळूहळू घडतात हे आपण समजून घेऊया आणि टीकाकारांकडे दुर्लक्ष करूया.

हेही वाचा – पिरामल फाऊंडेशन- समावेशकता व सक्षमीकरण तळागाळापर्यंत

वर्षभरातील बाजाररंग

या लेखमालेतून भारतीय बाजारातील घडणाऱ्या घडामोडींचा गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक निर्णयांशी थेट कसा संबंध आहे, हे दाखवण्याचा वर्षभर प्रयत्न झाला आहे. मान्सून पाऊस, निवडणुकांचे निकाल याच बरोबरीने एखाद्या क्षेत्रामध्ये होणारे दीर्घकालीन बदल (स्ट्रक्चरल चेंजेस) हेसुद्धा बाजाराला महत्त्वाचे वाटतात हे आपण समजून घेतले. युद्धजन्य परिस्थितीत जागतिक नेत्यांची होणारी भेट बाजारांकडून कशा पद्धतीने स्वीकारली जाईल किंवा नाकारली जाईल हेही या वर्षात आपण बघितले. वर्तमानपत्र आणि वाहिन्यांची आवडती ओळ ‘सेन्सेक्स आणि निफ्टीमधील वाढ’ अशी असली तरीही मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांनी हे वर्ष गाजवले हेही आपण पाहिले. मात्र याच मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये पोर्टफोलिओचा विचार करता कशी सावधगिरी असावी याचाही विचार आपण केला. हे वर्ष आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले असले, तरी आयपीओमध्ये नेमके होते काय? ऑफर फॉर सेल, नवीन शेअरची विक्री असे मूलभूत विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गुंतवणूक जागरूकता आणि बाजाररंग

या लेखमालिकेचा एक प्रमुख उद्देश जागरूक आणि अभ्यासू गुंतवणूकदारांचे विविध विषयांकडे लक्ष वेधणे हा होता. भारतीय वाहन उद्योगांमध्ये आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगात होत असलेले स्थितिशील बदल टिपल्यानंतर ईमेलद्वारे मिळालेले काही प्रतिसाद उत्साह वाढवणारे होते. अर्थसाक्षर, पैशाचा आणि गुंतवणुकीचा विचार करणारे गुंतवणूकदार तयार करणे हेच प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने या वर्षात सकारात्मक प्रयत्न करू शकलो याचे समाधान वाटते.

येत्या वर्षभराच्या काळात असेच बाजाररंग खुलावेत आणि तुमच्या गुंतवणुकीचे ढंग चांगल्या दिशने बदलावेत हीच सदिच्छा.

Story img Loader