जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सर्वाधिक बाजारभांडवल असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात १७ मे १७९२ रोजी एका कराराने झाली. यात सुरुवातीला २४ दलाल सामील होते आणि त्यांच्या करारानुसार ग्राहकाला किती ‘कमिशन’ लागू करावे आणि एका दलालाने समभागाची खरेदी-विक्री नोंदवली तर दुसऱ्या दलालाला ती काहीही करून पूर्ण करावीच लागेल असे लिहिले होते. या कराराला बॅटनवूड करार असे म्हटले जाते. सुरुवातीला ते सरकारी कंपन्यांचे समभाग खरेदी विक्री करत असत ज्याची व्याप्ती १८१७ नंतर वाढवण्यात आली. या करारामध्ये असणाऱ्यांनी आपले नाव ‘न्यूयॉर्क स्टॉक आणि एक्स्चेंज बोर्ड’ असे ठेवण्यात आले. वर्ष १८६४ मध्ये ओपन बोर्ड ऑफ स्टॉक ब्रोकर्स असा एक नवीन शेअर बाजार उभा राहिला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजसमोर प्रतिस्पर्धी निर्माण झाला. वर्ष १८६९ मध्ये या नवीन बाजारमंचाचे (स्टॉक एक्स्चेंज) विलीनीकरण करण्यात आले. यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजला एक नवीन दिशा आणि चांगले ग्राहकसुद्धा मिळाले. याच सुमारास सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजने आपली सदस्य संख्या मर्यादित केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा