जानेवारी ते एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील मध्यम, लघू वित्तीय संस्थांची / बँकांची बिकट आर्थिक परिस्थिती, त्यात कर्जावरील वाढते व्याजदरांचे ओझे, कित्येक प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर शून्यावर तर काही देश मंदीच्या गर्तेत जाण्याची शक्यता त्यात भारतात पर्जन्यमानाबद्दल परस्परविरोधी भाकिते, त्यात हिंडेनबर्ग आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून अदानी समूहांच्या समभागांच्या बाजारभावात रक्तपाताची परिस्थिती अशा धडकी भरणाऱ्या घटना घडत असताना, आपल्याकडे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील व्याज दरवाढीवर तात्पुरत्या पूर्णविरामाची घटना ही वळणबिंदू (टर्निंग पाॅइंट / गेम चेंजर) ठरली. त्यातून निफ्टीने तेजीची मोहक गिरकी घेत, निफ्टी निर्देशांक १ डिसेंबरच्या १८,८८७ च्या उच्चांकासमीप येऊन, नवीन उच्चांक प्रस्थापित होण्याची प्रक्रिया थोडक्यात हुकली. अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची भावना व त्यानंतरच्या घसरणीमुळे निर्माण होणारी धडधड. ‘धडकी-धडधड’ या हृदयातील, दोन भावनांचे बेमालूम मिश्रण सरलेल्या सप्ताहात आपण अनुभवले. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ६२,९७९.३७ / निफ्टी: १८,६६५.५०

निर्देशांक जेव्हा जेव्हा उच्चांकासमीप झेपावतो तेव्हा ही तेजी शाश्वत की तेजीचा बुडबुडा (बबल) याची चर्चा झडत असते. आज त्याचा आढावा घेऊया. यासाठी करोनाकालीन मार्च २०२० चा नीचांक ७,५११ हा स्तर केंद्रबिंदू मानत भविष्यकालीन निर्देशांकाच्या वाटचालीचा आढावा घेऊया. निफ्टी निर्देशांकावर ‘डाऊ संकल्पने’प्रमाणे तेजीच्या धारणेसाठी आलेखाची रचना ही चढत्या भाजणीतील उच्चांक आणि नीचांकाची आलेख रचना (हायर टॉप, हायर बॉटम) असण्याची गरज असते. जसे की उच्चांकाचा विचार करता, ९,८८९, १५,४३१, १८,६०४, १८,८८७ तर चढत्या भाजणीतील नीचांक ७,५११, ८,८००, १४,१५१, १५,१८३, १६,८२८ अशा स्वरुपात आहेत. यात निफ्टी निर्देशांक १८,६०४ चा उच्चांक दोन वेळा पार करण्यात यशस्वी ठरला. २० मार्चच्या १६,८२८ च्या नीचांकापासून २२ जूनच्या १८,८८६ उच्चांकापर्यंत २,०५८ अंशांची तेजी आली. त्या समोर २३९ अंशांची घसरण (१८,८८६ – १८,६४७ शुक्रवारचा नीचांक) म्हणजे ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे’ स्वरूपात ही घसरण चालू आहे. या घसरणीत निफ्टी निर्देशांकाचा येणाऱ्या दिवसातील प्रथम भरभक्कम आधार स्तर हा १८,५०० ते १८,३५० आणि द्वितीय आधार स्तर हा १८,००० ते १७,८०० असा असेल. आता चालू असलेल्या घसरणीत हे आधार निफ्टी निर्देशांक राखण्यास यशस्वी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १९,८०० ते २०,५०० असेल.

हेही वाचा – विश्लेषण : शेअर मार्केटमधून भरमसाठ पैसे कमावताय; ‘डब्बा ट्रेडिंग’मुळे तुमचंही होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या

आता मूलभूत संशोधनाचा (फंडामेंटल ॲनालिसिस) आधार घेता निफ्टी निर्देशांकाचे प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) हे ९०० ते ९५० येत आहे आणि आजच्या घडीला १८,८८७ उच्चांकावर निफ्टी निर्देशांकाचा पीई रेशो हा २१ च्या दरम्यान येत आहे (१८,८८७ भागिले ९००) जो भविष्यातील वाटचाल बघता समाधानकारक आहे. कारण १९९२ ची हर्षद मेहता, २०००चा डॉट कॉम बूम (संगणक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजी), २००८ ची जागतिक महामंदीच्या अगोदरची तेजी त्या वेळला पीई रेशो हा ३० ते ५० च्या घरात पोहोचलेला होता. जे ‘बाळसं नसून सूज’असल्याचे दिशानिर्देशन करत होते. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १९,८०० ते २०,५०० हे असून, या वर्षीच पर्जन्यमान समाधानकारक असेल यावर ही आकडेवाडी बेतलेली आहे. तसे घडावे हीच इच्छा अन्यथा सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन सुधारित निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा अंदाज घ्यावा लागेल.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची या स्तंभातील २३ एप्रिलच्या लेखात बँकिंग क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या समभागाचा निकालपूर्व आढावा घेतला होता. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २९ एप्रिल होती. २१ एप्रिलचा बंद भाव ५६.४५ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ५५ रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ५५ रुपयांचा स्तर राखत ६४ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. २९ एप्रिलला जाहीर झालेला वित्तीय निकाल उत्कृष्ट असल्याने लेखात नमूद केलेले ६४ रुपयांचे वरचे लक्ष्य हे १६ मे रोजी ६८ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले गेले. अल्पमुदतीच्या गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत १३ टक्क्यांचा परतावा मिळविता आला. शुक्रवार, २३ जूनचा बंद भाव ७७ .७५ रुपये आहे.

शिंपल्यातील मोती

दिलीप बिल्डकॉन लिमिटेड (शुक्रवार, २३ जूनचा भाव २३३.१५ रु.)

अभियांत्रिकी क्षेत्रातील ईपीसी हा तीन अक्षरी शब्द हा दिवाळीच्या पाडव्यातील पौराणिक कथेतील श्रीविष्णूंच्या वामन अवतारातील तीन पावलांसारखा सर्वव्यापी वाटतो. ईपीसी म्हणजे (इंजिनीअरिंग प्रोक्युअरमेंट ॲण्ड कस्ट्रक्शन कंपनी) अभियांत्रिकी/बांधकाम क्षेत्रातील प्रकल्प हाती घेऊन ते कार्यान्वित करणे यात रस्ते बांधणी, नदीवरील पूल, विमानतळ, धरण, मेट्रो रेल्वे प्रकल्प, भुयारी मार्ग, खाण प्रकल्प, प्रधानमंत्री गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम अशी अतिविशाल, अजस्र बांधकाम ‘तीन गोंडस शब्दांत सामावून घेणारी’ या क्षेत्रातील आघाडीची कंपनी दिलीप बिल्डकॉन लिमिटेड हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

हेही वाचा – व्याजदर वाढीच्या धसक्याने सेन्सेक्समध्ये २५० अंशांची घसरण

आर्थिक आघडीवर मार्च २०२२ ते मार्च २०२३ असा वार्षिक आढावा घेतल्यास, मार्च २०२२ मध्ये कंपनीची वार्षिक विक्री २,५०६.२० कोटींवरून मार्च २०२३ मध्ये २,८५७.२९ कोटी झाली. तर करपूर्व नफा ४.११ कोटींवरून ७८.३२ कोटी तर निव्वळ नफा २.९९ कोटींवरून ५८.३१ कोटींवर झेपावला. ही आर्थिक नेत्रदीपक कामगिरी समभागाच्या बाजारभावावर परावर्तित करता, समभागांनी आपल्या भोवती २० रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केला असून समभागाची २१० ते २४० रुपयांमध्ये वाटचाल सुरू आहे. समभाग २४० रुपयांवर १५ दिवस टिकल्यास, समभागात शाश्वत तेजी अपेक्षित असून भविष्यकालीन अल्पमुदतीची वरची लक्ष्य ही २६० रु….२८० रु…. ३५० रुपये असतील, तर दीर्घमुदतीच लक्ष्य हे ५०० रुपये असेल. जेव्हा समभागात मंदी येईल तेव्हा २२५ ते २०० रुपयांच्या दरम्यान हा समभाग २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १५० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

(ashishthakur1966@gmail.com)

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.